शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

500 रुपयांचे सुट्टे करण्यासाठी खरेदी केलं लॉटरीचं तिकीट, 5 तासांनंतर बनले 'करोडपती'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 18:16 IST

सदानंदन यांना 500 रुपयांचे सुट्टे हवे होते. यामुळे त्यांनी सेलवन नावाच्या एका स्थानिक लॉटरी विक्रेत्याकडून लॉटरीचे तिकीट विकत घेतले होते...

केरळमधील सदानंदन ओलीपराम्बिल (Sadanandan Oliparambil) या व्यक्तीने तब्बल 12 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. रविवारच्या सकाळी सदानंदन भाजी आणण्यासाठी घराबाहेर पडले. पण त्यांच्याकडे 500 रुपयांचे सुट्टे नव्हते. यामुळे त्यांनी एका दुकानातून लॉटरीचे तिकीट खरेदी करून सुट्टे केले. खरे तर सदानंद बऱ्याच दिवसांपासून लॉटरीची तिकिटे विकत घेत होते. पण त्यांचे नशीब साथ देत नव्हते. मात्र यावेळी देणाऱ्याने त्यांना 'छप्पर फाड के' दिले आहे. हे लॉटरीचे तिकीट खरेदी केल्यानंतर काही तासांतच आपण जॅकपॉट वेजेते झालो असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याची बक्षीस रक्कम तब्बल 12 कोटी रुपये एवढी होती.

केरळमधील कोट्टायमची घटना - 77 वर्षीय सदानंदन ओलीपारंबिल हे मूळचे केरळमधील कोट्टायम येथील आहेत. ते केरळ सरकारच्या ख्रिसमस-न्यू इयर लॉटरी (ख्रिसमस न्यू इयर बंपर 2021-22) मध्ये 12 कोटी रुपयांचे पहिले बक्षीस जिंकून चर्चेत आले आहेत. खरे तर, ते गेल्या अनेक वर्षांपासून लॉटरीची तिकिटे खरेदी करत होते, पण बंपर बक्षीस जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

काही तासांतच झाले कोट्यधीश -सदानंदन यांना 500 रुपयांचे सुट्टे हवे होते. यामुळे त्यांनी सेलवन नावाच्या एका स्थानिक लॉटरी विक्रेत्याकडून लॉटरीचे तिकीट (XG 21858) विकत घेतले. ते म्हणाले, मी मांसाच्या दुकानाकडे जाताना पाचशे रुपयांचे सुट्टे करण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांना सुट्टे मिळाले नाही, म्हणून त्यांनी लॉटरीचे तिकीट विकत घेतले आणि दुपारी लॉटरीचा निकाल आल्यानंतर ते थक्क झाले. कारण काही तासांत ते 'कोट्यधीश' झालो होते, यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता.

संघर्षमय जीवन - सदानंदन हे आपल्या पत्नी आणि मुलांसह एका छोट्याशा घरात राहतात. तो व्यवसायाने पेंटर आहेत. कोरोना परिस्थितीमुळे त्यांची परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. ते म्हणतात, आता मला माझे स्वतःचे छान घर बांधायचे आहे आणि माझ्या मुलांचे भविष्य सावरायचे आहे. 

12 कोटी नव्हे, एवढे रुपये मिळणार -माध्यमांतील वृत्तांनुसार, सदानंद यांना कर आणि लॉटरी एजंटचे कमिशन कापून सुमारे 7.39 कोटी रुपये मिळतील. केरळच्या लॉटरी विभागाने 47 लाखांहून अधिक तिकिटे विकली होती. 300 रुपये किमतीचे हे तिकीट कोट्टायम शहरातील बिजी वर्गीस या लॉटरी एजंटने कुडेमपाडीजवळील पांडवम येथील लॉटरी विक्रेता कुन्नेपरंबिल सेल्वन यांना विकले होते.

टॅग्स :KeralaकेरळMONEYपैसा