कोराडी बलात्कार प्रकरण
By admin | Updated: February 8, 2015 00:19 IST
आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला
कोराडी बलात्कार प्रकरण
आरोपींचा जामीन अर्ज फेटाळलाकोराडी बलात्कार प्रकरणनागपूर : कोराडी येथील एका ३० वर्षीय विवाहितेवरील बलात्कार प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. तरारे यांच्या न्यायालयाने दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. संदीप अंबादास कुरील (२६) रा. महादुला आणि सुमीत प्रभू बोरकर (२०) रा. इंदिरा प्रगतीनगर, अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांनी या महिलेला कधी बदनामी करण्याची तर कधी तिच्या मुलीचे अपहरण करण्याची भीती दाखवून वारंवार बलात्कार केला. जुलै ते सप्टेंबर २०१४ या दरम्यान खुद्द पीडित महिलेच्या घरी आणि सावनेरच्या लॉजमध्ये हा प्रकार घडला. भीतीमुळे ती पोलिसात तक्रारही करीत नव्हती. अखेर धाडस करून तिने २२ जानेवारी २०१५ रोजी आधी सावनेर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. परंतु गुन्ह्यास प्रारंभ कोराडी हद्दीतून झाल्याने सावनेर पोलिसांनी तिला कोराडी पोलीस ठाण्यात नेले होते. या पोलिसांनी भादंविच्या ३७६ (२) (जे), ५०६ ब, ४५२ कलमान्वये गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली होती. ते सध्या कारागृहात आहेत. त्यांनी जामीन अर्ज दाखल केला असता तो फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील नितीन देशमुख यांनी काम पाहिले. सहायक पोलीस निरीक्षक पी. पी. देसले हे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत.