शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘कू’वर प्रश्नचिन्ह; युजर्स डेटाची गळती, चिनी संबंधांवरही बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 07:19 IST

'कू’च्या निर्मात्यांनी या सर्व शंका फेटाळून लावल्या

नवी दिल्ली : ट्विटरला अस्सल भारतीय पर्याय म्हणून ‘कू’ या मायक्रोब्लॉगिंग ॲपला प्रोत्साहन देण्याचा केंद्र सरकारचा पातळीवर प्रयत्न होत असतानाच या ॲपसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. आतापर्यंत ३० लाख भारतीयांनी ‘कू’ ॲप डाऊनलोड केले आहे. मात्र, या ॲपवरून युजर्स डेटाची गळती होत असून, या ॲपच्या निर्मितीत चिनी गुंतवणूक असल्याचेही उघड होऊ लागले आहे. मात्र, ‘कू’च्या निर्मात्यांनी या सर्व शंका फेटाळून लावल्या आहेत.ट्विटरवर इलियॉट अँडरसन या नावाने प्रसिद्ध असलेल्या रॉबर्ट बाप्टिस्ट या फ्रेंच सायबर सुरक्षा तज्ज्ञाने ‘कू’मधील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या आहेत. ‘कू’ ॲप डाऊनलोड करणाऱ्या युजर्सचे नाव, त्याचा ई-मेल आयडी, जन्मतारीख, वैवाहिक स्थिती आणि लिंग यासारख्या वैयक्तिक माहितीची गळती होत असल्याचे बाप्टिस्ट यांनी स्पष्ट केले आहे. आतापर्यंत ३० लाख लोकांनी हे ॲप डाऊनलोड केल्याने त्यांचा वैयक्तिक तपशील इतरांच्या हाती लागलेला असावा तसेच मोठमोठ्या सरकारी अधिकाऱ्यांनीही ‘कू’च्या वापराला सुरुवात केल्याने त्यांच्याही वैयक्तिक माहितीची चोरी झाली असावी, असा अंदाज बाप्टिस्ट यांनी व्यक्त केला आहे. ‘कू’च्या चिनी संबंधांविषयीही बाप्टिस्ट यांनी भाष्य केले आहे. ॲपच्या डोमेननावाचा भूतकाळातील तपशील त्यासाठी त्यांनी सादर केला आहे. परंतु त्यात फारसे तथ्य नसल्याचे स्पष्ट होत आहे.‘कू’चे स्पष्टीकरण‘कू’च्या निर्मात्यांनी वरील सर्व शंका फेटाळून लावल्या आहेत. ॲपवर युजर्स जेव्हा त्यांचा प्रोफाईल डेटा ॲपवर अपलोड करतात तीच माहिती ‘कू’वर सर्वत्र दिसते. तसेच युजर्सचा वैयक्तिक तपशील गहाळ होत असल्याची शंकाही हास्यास्पद असून पब्लिक प्रोफाईल पेजवर ती माहिती सर्वांनाच दिसते, असे ‘कू’कर्त्यांनी स्पष्ट केले आहे.चिनी गुंतवणुकीविषयी बोलताना ‘कू’ने तेही आरोप फेटाळले आहेत. ‘कू’ची नोंदणी भारतात झाली असून त्याचा आम्हाला अभिमान आहे. ‘कू’ची पितृक कंपनी असलेल्या बॉम्बिनेट टेक्नॉलॉजीज या कंपनीत मोहनदास पै यांनी गुंतवणूक केली आहे. त्यांच्या ३वन४ या कंपनीद्वारे पै यांनी ही गुंतवणूक केली असल्याचे ‘कू’तर्फे स्पष्ट करण्यात आले. आमच्या व्होकल या अन्य स्टार्ट-अपमध्ये शुनवेई या चिनी कंपनीने गुंतवणूक केली होती. परंतु ती आता पूर्णपणे बाहेर पडत असल्याचेही कंपनीने निवेदनात नमूद केले आहे.