शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

नवा कायदा आणणार, १० दिवसांत बलात्कार पीडितांना न्याय मिळेल - ममता बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 14:39 IST

Kolkata Doctor Case And Mamata Banerjee : ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजपला न्याय नको आहे, ते फक्त बंगालला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Kolkata Doctor Case And Mamata Banerjee : कोलकाता येथील आरजी कर हॉस्पिटलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरला न्याय मिळावा, यासाठी कोलकाता येथे गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. तसेच, या घटनेच्या निषेधार्थ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत मंगळवारी मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. 

या आंदोलनाला 'नबन्ना प्रोटेस्ट' असं नाव देण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार केला. या कारवाईच्या विरोधात भाजपने आज  बंगाल बंदची हाक दिली आहे. या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाष्य केलं आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजपला न्याय नको आहे, ते फक्त बंगालला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, आम्ही असा कायदा आणू, ज्यामध्ये १० दिवसांत खटला संपेल, असेही त्या म्हणाल्या. 

बलात्कार पीडितांना न्याय मिळवून देण्याबाबत ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, आम्ही पुढील आठवड्यात विधानसभेचे अधिवेशन बोलवू. पश्चिम बंगालमध्ये बलात्कार पीडितांना न्याय देण्यासाठी आम्ही एक नवीन कायदा आणू, जिथे फक्त १० दिवसांत केस संपेल. हा प्रस्ताव राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. राज्यपालांनी तो मंजूर न केल्यास आम्ही राजभवनासमोर आंदोलनही करणार आहेत, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

आज भाजपने पुकारलेल्या १२ तासांच्या 'बंगाल बंद'बाबत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आम्ही आजचा दिवस आरजी कर डॉक्टरसाठी समर्पित केला आहे. आम्हाला याप्रकरणी न्याय हवा आहे, पण भाजपने आज बंदची हाक दिली आहे. त्यांना न्याय नको आहे, ते फक्त बंगालची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका केली. 

याचबरोबर, आम्ही हा दिवस अशांना समर्पित करत आहोत, ज्यांनी यातना सहन केल्या. मृतदेहांचे राजकारण करण्यासाठी भाजपने जाणीवपूर्वक बंद पुकारला आहे. ते डॉक्टरांचा विरोध वळविण्याचा प्रयत्न करत आहेत. मी त्यांचा निषेध करते. भाजपच्या लोकांनी बस पेटवून दिली आणि पोलिसांवर अमानुष हल्ला केला. रेल्वे सेवाही विस्कळीत केली, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

पंतप्रधानांच्या विरोधात भाजपने बंद ठेवला पाहिजे - ममता बॅनर्जीआम्ही या बंदला पाठिंबा देत नाही. भाजपने कधीही उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि अगदी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. भाजप खूप अत्याचारी आहे, भाजप अत्याचाराने भरलेला आहे. भाजपने पंतप्रधानांच्या विरोधात बंद ठेवला पाहिजे. उत्तर प्रदेश, आसाम, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील घटनांची पंतप्रधानांनी कोणतीही जबाबदारी घेतली नाही. आम्ही कालचे (नबन्ना प्रोटेस्ट रॅली) फोटो पाहिले, परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळल्याबद्दल मी पोलिसांना सलाम करते, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा