शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

खोलीत चुकून गेलो, तेथे मृतदेह आधीपासून होता, कोलकाता बलात्कार प्रकरणाती प्रमुख आरोपीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 06:41 IST

Kolkata Rape & Murder Case: कोलकातामधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्याप्रकरणात नवा द्विस्ट येण्याची शक्यता आहे.

कोलकाता -  कोलकातामधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्याप्रकरणात नवा द्विस्ट येण्याची शक्यता आहे. मी सेमिनारच्या खोलीत चुकून गेलो. तेथे डॉक्टरचा मृतदेह आधीच खाली पडलेला होता. तिला हलवून पाहिले. मात्र, काहीच हालचाल झाली नाही. त्यामुळे मी घाबरून पळालो आणि कशाचा तरी धक्का लागून धडपडलो. त्यावेळी ब्लूटूथयंत्र खाली पडले, असा दावा याप्रकरणातील प्रमुख आरोपी संजय रॉय याने केला आहे. त्याची पॉलिग्राफ चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्याला विचारण्यात आलेल्या प्रश्नांमधून ही माहिती त्याने दिली आहे.

संजय रॉय याने सांगितले की, ८ ऑगस्टच्या रात्री एका रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. त्याला ऑक्सिजनची गरज होती. त्यासाठी डॉक्टरला शोधत होतो. त्यावेळी तिसऱ्या मजल्यावरील सेमिनारच्या खोलीत गेलो. तेथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह पडलेला होता. मी त्या डॉक्टरला आधीपासून ओळखत नव्हतो, असेही रॉय याने सांगितले. महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येचा तपास सीबीआय करीत आहे. याप्रकरणी आतापर्यंत १० जणांची पॉलिग्राफ चाचणी झालेली आहे.

'भाजी-चपाती नको, मला चाऊमिन द्या'■ संजय रॉय हा सध्या तुरुंगात आहे. तेथे तो जेवणावरून नखरे करीत असल्याची माहिती आहे. त्याला तुरुंगात मिळणारी भाजी- चपाती नकोय. रोज तो नवी मागणी करत आहे.■ त्याला साध्या खाण्याचा कंटाळा आला असून चमचमीत चायनीज अन्न त्याला हवे आहे. मात्र, तुरुंग प्रशासनाने त्याला फटकारले असून असले काहीही मिळणार नसल्याचे स्पष्ट केले.

 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारी