शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

आई वडिलांपासून वेगळे राहण्यासाठी बायको करते हट्ट?; हायकोर्टानं सुनावला निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 12:39 IST

पत्नीच्या घटस्फोट याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने हे विधान केले आहे

कोलकाता - पती-पत्नीच्या घटस्फोट याचिकेवर हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. एका पतीला पत्नीपासून घटस्फोट घेण्याचा अधिकार आहे. जर पत्नी पतीचा मानसिक छळ करत असेल. त्याला त्रास देत असेल त्याचसोबत पतीला कुठल्याही ठोस कारणाशिवाय आई वडिलांपासून वेगळे राहण्यासाठी दबाव टाकत असेल तर पतीला घटस्फोट घेण्याचा अधिकार आहे असं हायकोर्टाने म्हटलं आहे. 

पत्नीच्या घटस्फोट याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने हे विधान केले आहे. फॅमिली कोर्टाने पतीचा घटस्फोट मंजूर केला होता. मात्र या कोर्टाच्या आदेशाला पत्नीने हायकोर्टाने आव्हान दिले. या सुनावणीवेळी न्यायाधीशांनी म्हटलं की, आई वडिलांची काळजी घेणे ही मुलाची जबाबदारी आहे. भारतात लग्नानंतर मुलाने आई वडिलांसह राहणे सामान्यबाब आहे असंही कोर्टाने सांगितले आहे. 

क्रूरतेच्या आधारे पतीला मिळाला घटस्फोट२००९ मध्ये पश्चिम मिदनापूर येथे एका फॅमिली कोर्टाने पतीला पत्नीच्या क्रूरतेचा दाखला देत घटस्फोट मंजूर केला होता. या दाम्पत्याचे लग्न २००१ मध्ये झाले होते. पतीच्या आरोपानुसार, पत्नी सार्वजनिकरित्या बदनामी करते. पती व्यवसायाने शिक्षक आहे परंतु त्याची कमाई कमी असल्याने घरखर्च चालवण्यासाठी पुरेसे नाही. कुटुंबात मुलांसह आई वडीलही राहतात. पत्नी दबाव टाकून दुसरीकडे फ्लॅट घेण्याचा आग्रह धरत आहे. पतीला तो खर्च परवडणारा नाही हेदेखील तिला माहिती आहे. पतीला सरकारी नोकरी मिळणार होती तेव्हा त्याच्यावर गुन्हेगारी खटला दाखल केला. त्यामुळे त्याची सरकारी नोकरी गेली. 

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा हवालाकोर्टाने म्हटलं की, पत्नी कुठल्याही ठोस कारणाशिवाय पतीला आई वडिलांपासून दूर राहण्यासाठी दबाव टाकते. ही एकप्रकारची क्रूरता आहे. कोर्टाने २०१६ मधील सुप्रीम कोर्टाच्या एका निकालाचा दाखला दिला. ज्यात एका पत्नीने पतीवर दबाव टाकून आई वडिलांपासून वेगळे राहण्यासाठी छळ केला. त्यावर पतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यावर घटस्फोटासाठी हे कारण पुरेसे आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. वारंवार पतीला आई वडिलांपासून वेगळे राहण्यासाठी हट्ट करणे, ही क्रूरता असून कोर्टाने पत्नीची याचिका फेटाळून लावली आहे. 

टॅग्स :Courtन्यायालय