शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

"न्यायमूर्ती चॅटर्जींना मारून टाका"; शर्मिष्ठा पनोलीचा जामीन नाकारणाऱ्या न्यायाधीशांना जीवे मारण्याच्या धमक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:24 IST

वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणात जामीन न दिल्याने कोलकाता हायकोर्टाच्या न्यायमूर्तींना जीवे मारण्याच्या धमक्या

Sharmista Panoli Case: ऑपरेशन सिंदूरवरुन सोशल मीडिया पोस्टद्वारे धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर शर्मिष्ठा पनोलीला कोलकाता कोर्टाने जामीन देण्यास नकार दिला आहे. कोर्टाने कायद्याची विद्यार्थिनी असलेल्या २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोलीचा जामीन नाकारत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.  ऑपरेशन सिंदूरनंतर बॉलिवूड कलाकारांनी बाळगलेल्या मौनावर तिने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यानंतर हरियाणाच्या गुरुग्राम येथून कोलकाता पोलिसांनी तिला अटक केली होती. आता पनोलीला जामीन नाकारणाऱ्या न्यायमूर्तींना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणात शर्मिष्ठा पनोलीला जामीन देण्यास नकार दिल्यानंतर कोलकाता हायकोर्टाचे न्यायाधीश पार्थ सारथी चॅटर्जी यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. ३ जून रोजी पनोलीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यापासून, अनेक निनावी आणि बनावट अकाउंटवरुन न्यायाधीशांविरुद्ध अपमानास्पद टीका केली जात असून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या पोस्ट केल्या जात आहेत.

पार्थ सारथी चॅटर्जीला मारहाणीची गरज आहे. त्यासाठी हिंदुस्थानात अज्ञात बंदुकधारींची गरज आहे, न्यायमूर्ती चॅटर्जींना मारून टाका, जर कोणाला यांचा (न्यायाधीश चॅटर्जी) पत्ता किंवा मोबाईल नंबर माहित असेल तर सांगा, हे न्यायमूर्ती कधी तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी भेटले तर त्यांना योग्य वागणूक द्या, अमित शहाजी, तुम्ही त्यांना काही अनोळखी लोकांकडून बेल्ट ट्रीटमेंट मिळवून देऊ शकता का? अशा धमक्या न्यायमूर्ती पार्थ सारथी चॅटर्जी यांना फेक अकाऊंटवरुन मिळत आहेत.

पुण्यातील सिम्बायोसिस लॉ स्कूलची विद्यार्थिनी असलेल्या शर्मिष्ठा पनोलीला ३० मे रोजी गुरुग्राममध्ये अटक करण्यात आली होती. एफआयआरमध्ये तिच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. ऑपरेशन सिंदूरनंतर बॉलिवूड कलाकारांनी बाळगलेल्या मौनावर तिने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. व्हायरल व्हिडिओबद्दल टीका झाल्यानंतर, पनोलीने तो व्हिडिओ काढून टाकला आणि एक्सवरुन माफी मागितली होती. मात्र त्यानंतरही तिला अटक करण्यात आली. कोर्टाने पनोलीचा जामीन नाकारताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य धार्मिक भावना दुखावण्याची परवानगी देत ​​नाही, अशी टिप्पणी केली होती.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरHigh Courtउच्च न्यायालय