शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर काय केलं? आरजी कर मेडिकल कॉलेजच्या माजी प्राचार्याला CBI चे 4 प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 16:53 IST

पीडितेच्या आई-वडिलांना तीन तास का वाट बघावी लागली...?

कोलकात्यातील डॉक्टरवरील कथित बलात्कार आणि मृत्यूच्या घटनेने संपूर्ण देशाला हादरा दिला आहे. यातच, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो अर्थात CBI च्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सलग चौथ्या दिवशी आरजी कर मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची चौकशी केली. रुग्णालयात तैनात महिला डॉक्टरसोबत कथित बलात्कार आणि हत्येच्या तपासासंदर्भात घोष यांची चौकशी करण्यात आली. एका अधिकाऱ्याने ही माहिती देत म्हटले आहे की, घोष सोमवारी सकाळच्या सुमारास सीजीओ कॉम्प्लेक्स येथील सीबीआय कार्यालयात पोहोचले होते.

आरजी कर मेडिकल कॉलेजच्या माजी प्राचार्यांना CBI चे 4 प्रश्न -1. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर, त्यांची भूमिका काय होती? असा प्रश्न घोष यांना विचारण्यात आला.2. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कुणासोबत संपर्क साधला?3. पीडितेच्या आई-वडिलांना तीन तास का वाट बघावी लागली?4. घटनेनंतर रुग्णालयाच्या आपत्कालीन इमारतीतील सेमिनार हॉलजवळील खोल्यांच्या दुरुस्तीचा आदेश कुणी दिला होता?

सीबीआय अधिकाऱ्यांनी शुक्रवारपासून गेले तीन दिवस घोष यांच्यासोबत काही तास चौकशी केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी घोष यांच्या मोबाईल फोनची 'कॉल लिस्ट', तसेच त्याच्या व्हॉट्सॲप 'चॅट लिस्ट'चीही तपासणी करत आहेत.

घोष यांनी व्यक्त केली आहे हल्ल्याची भीती -महिला डॉक्टरचा मृतदेह आढळल्यानंतर, दोन दिवसांनी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी ऑर्थोपेडिक तज्ज्ञ घोष यांनी आरजी कार मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यपदाचा राजीनामा दिला होता. त्यानी हल्ल्याची भीतीही व्यक्त केली होती, यानंतर त्याच्या वकिलाने कोलकाता उच्च न्यायालयात संरक्षण मागितले होते. यानंतर, न्यायालयाने त्यांना एकल खंडपीठासमोर जाण्याचे निर्देश दिले होते. पीजी प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह ९ ऑगस्ट रोजी आरजी कार हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये आढळून आला होता. यानंतर, पोलिसांनी दुसऱ्या दिवशी एकाला अटक केली होती.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCBIगुन्हा अन्वेषण विभागdoctorडॉक्टर