शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kolkata Doctor Case : "त्यांच्या कुटुंबात असं घडलं असतं तर ममतांनी असं म्हटलं असतं का?"; ट्रेनी डॉक्टरचे पालक संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 11:59 IST

Kolkata Doctor Case And Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता निर्भया प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलं त्याबद्दल डॉक्टरच्या वडिलांनी संताप व्यक्त केला आहे.

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील ट्रेनी डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता निर्भया प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलं त्याबद्दल डॉक्टरच्या वडिलांनी संताप व्यक्त केला आहे. ममता बॅनर्जी यांनी केलेल्या आवाहनावर आता मुलीच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

ममता बॅनर्जींनी लोकांना निदर्शनांपासून लक्ष हटवून दुर्गापूजेवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं आहे. या विधानाबाबत पीडितेच्या वडिलांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "आम्हाला असं वाटतं की, यावर्षी कोणीही दुर्गापूजा साजरी करणार नाही. जर कोणी साजरी केली तर ते आनंदाने साजरे करणार नाहीत, कारण बंगाल आणि देशातील सर्व लोक माझ्या मुलीला आपली मुलगी मानत आहेत." 

ट्रेनी डॉक्टरच्या आईने ममता बॅनर्जी यांनी 'दुर्गा पूजे'वर केलेल्या विधानाला असंवेदनशील म्हटलं आहे. त्यांनी इंडिया टुडेला सांगितले की, "आम्ही आमच्या मुलीसोबत दुर्गापूजा साजरी करायचो, पण येत्या काही वर्षांत आम्ही दुर्गापूजा किंवा इतर कोणताही सण कधीच साजरा करणार नाही. त्यांची टिप्पणी असंवेदनशील आहे. जर त्यांच्या कुटुंबात असे घडलं असतं, तर त्यांनी असं म्हटलं असतं का? माझ्या घरचा दिवा कायमचा विझला आहे. त्याने माझ्या मुलीची गळा दाबून हत्या केली. आता ते आम्ही करत असलेल्या न्यायाची मागणी दाबण्याचा प्रयत्न करत आहेत."

"पोलिसांनी जबरदस्तीने शूट केला Video"; आई-वडिलांच्या नव्या दाव्याने खळबळ

आरजी कर रुग्णालयातील आंदोलक डॉक्टरांसोबत सहभागी झालेल्या मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांनी कोलकाता पोलिसांनी मृतदेहावर घाईघाईने अंत्यसंस्कार करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. महिला डॉक्टरच्या वडिलांनी सांगितलं की, आम्हाला आमच्या मुलीचा मृतदेह ठेवायचा होता, पण आमच्यावर खूप दबाव टाकण्यात आला आणि तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला बाजूला घेऊन पैसे देऊ केल्याचा आरोपही पीडितेच्या वडिलांनी केला आहे. त्यांच्या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनानंतर आणि अंत्यसंस्काराआधी घरी आणण्यात आला. मात्र मुलीच्या वडिलांनी पैसे घेण्यास नकार देत आपलं मत मांडलं. या प्रकरणी टीएमसीने महिला डॉक्टरच्या पालकांच्या वतीने पोलिसांनी दबाव आणल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारीMamata Banerjeeममता बॅनर्जीdoctorडॉक्टर