शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
3
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
4
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
5
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
6
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
7
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
8
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
9
Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
10
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
11
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
12
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
13
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
14
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
15
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
16
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
17
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
18
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
19
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
20
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

कोहिनूर हिरा ब्रिटनने लुटून नेलेला नाही, तर भेट दिला!

By admin | Updated: April 19, 2016 04:31 IST

जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा ब्रिटनने भारतावर राज्य करीत असताना येथून लुटून किंवा जबरदस्तीने नेलेला नाही, तर पंजाबच्या तत्कालीन राजाने तो त्यांना भेट दिला आहे.

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा ब्रिटनने भारतावर राज्य करीत असताना येथून लुटून किंवा जबरदस्तीने नेलेला नाही, तर पंजाबच्या तत्कालीन राजाने तो त्यांना भेट दिला आहे. त्यामुळे भारत हा हिरा परत करण्याची मागणी ब्रिटनकडे करू शकत नाही, असे केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयास सांगितले.सरन्यायाधीश न्या. तीर्थ सिंह ठाकूर व न्या. उदय लळित यांच्या खंडपीठापुढे हे निवेदन करताना सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांनी सांगितले की, मी ही सांस्कृतिक मंत्रालयाची भूमिका सांगत आहे. मात्र परराष्ट्र मंत्रालयाने यावर त्यांची भूमिका अद्याप कळविलेली नाही.रणजीत कुमार म्हणाले की, शिखांबरोबर झालेल्या युद्धांत ब्रिटिशांनी पंजाब काबीज केल्यानंतर पंजाबचे तत्कालीन शासक महाराजा रणजीत सिंग यांनी कोहिनूर हिरा ईस्टइंडिया कंपनीला भेटीदाखल दिला होता. पुढे १८५०मध्ये पंजाबचे गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरिया यांना तो ‘नजराणा’ म्हणून नेऊन दिला.कोहिनूर हिरा ब्रिटनकडून परत मिळविण्यासाठी पावले उचलण्यास केंद्र सरकारला सांगावे, अशी विनंती करणारी ‘आॅल इंडिया ह्युमन राईट््स अ‍ॅण्ड सोशल जस्टिस फ्रंट’ने केलेली जनहित याचिका न्यायालयापुढे आहे. हा हिरा ब्रिटनकडे परत मागण्यात अडचणी येतील, असे वाटत असेल तर सरकारने त्याविषयीची आपली भूमिका स्पष्ट करावी, असे न्यायालयाने ९ एप्रिल रोजी सांगितले होते.त्यावर सॉलिसिटर जनरलनी वरीलप्रमाणे निवेदन केल्यावर न्यायालयाने केंद्र सरकारला सहा आठवड्यांत नेमकी भूमिका स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र करण्यास सांगितले.१०५ कॅरेट वजनाचा व सुमारे २०० दशलक्ष डॉलर किमतीचा कोहिनूर एकेकाळी जगातील सर्वांत मोठा हिरा मानला जात असे. भारतातून ब्रिटनला नेल्यावर हा हिरा ब्रिटनच्या शाही मुकुटात बसविला गेला. महाराणी व्हिक्टोरिया यांनी राज्याभिषेकाच्या वेळी कोहिनूर हिरा बसविलेला तो राजमुकुट परिधान केला. सध्या हा हिरा लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)—————————-ब्रिटनचा ठाम विरोधभारत सरकारने कोहिनूर हिरा ब्रिटनकडून परत आणावा ही मागणी फार जुनी आहे. अनेकांनी त्याची सांगड राष्ट्रीय अस्मितेशीही घातली. परंतु ब्रिटनने मात्र तो हिरा परत करण्यास ठाम नकार दिला आहे. १९७६मध्ये तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान जिम कॅलेघन यांनी ब्रिटिश व शिखांमध्ये झालेल्या शांतता कराराचा दाखला देत सर्वप्रथम नकार देताना म्हटले की, ‘मी हा हिरा (भारताला) परत करण्याचा सल्ला सम्राज्ञीला देणार नाही.’ सन २००३मध्ये हाच सूर कायम ठेवत तेव्हाचे ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून म्हणाले होते, ‘ही एक मागणी मान्य केली तर अशाने संपूर्ण ब्रिटिश म्युझियम कालांतराने ओस पडेल!’