शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार नव्हे, तर 4 हजार येणार, जाणून घ्या काय आहे मोदी सरकारचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 19:30 IST

केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये नव्हे, तर 4 हजार रुपये जमा होणार आहेत.

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये नव्हे, तर 4 हजार रुपये जमा होणार आहेत. मोदी सरकारनं शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या योजनेत ऐनवेळी बदल केला आहे. मोदी सरकार लोकसभा निवडणुकीच्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यात दोन टप्प्यांत पैसे जमा करणार आहेत. यात शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 4 हजार रुपये येणार आहेत. या योजनेचा 12 कोटी लघू आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून, त्यांच्या खात्यात महिन्याला 500 असे वर्षाला 6 हजार रुपये जमा होणार आहेत.या योजनेनुसार लोकसभा निवडणुकांआधीच शेतक-यांच्या खात्यांवर पहिल्या दोन टप्प्यांत 4 हजार रुपये जमा होतील. या योजनेचा लाभ मिळविणारे सर्वाधिक अल्पभूधारक शेतकरी हे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश व ओडिशामध्ये असून, या राज्यांत जमिनीच्या नोंदींचे डिजिटायझेशन 98 ते 100 टक्के पूर्ण झाले आहे. या योजनेची अंमलबजावणी केल्यास 31 मार्चपूर्वी शेतक-यांच्या खात्यावर मदतीचा पहिला 2 हजार रुपयांचा हप्ता जमा होईल. त्यानंतर मदतीचा पुढचा 2 हजारांचा हप्ताही एप्रिलमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जाईल. अवघ्या दोन महिन्यांत 4 हजार रुपये मिळणे ही शेतक-यांसाठी नक्कीच आनंदाची बाब आहे. देशात एक हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतक-यांची संख्या 9.98 कोटी आहे, तर 2.57 कोटी शेतक-यांकडे 1 ते 2 हेक्टर जमीन आहे. त्याहून अधिक जमीन असलेल्या शेतक-यांची संख्या 1.95 कोटी आहे.या शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा फायदा- ज्यांच्याकडे 2 हेक्टर जमीन आहे, त्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा  होणार असून, 12 कोटी शेतकरी लाभार्थी ठरण्याची शक्यता आहे. या शेतकऱ्यांना मिळणार नाही फायदा- सरकारी नोकरी, माजी मंत्री, जवान, जिल्हा पंचायत अध्यक्ष, केंद्र आणि राज्य सरकारमधले अधिकारी ज्यांची पेन्शन 10 हजार आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. व्यावसायिक, डॉक्टर, इंजिनीअर, सीए, आर्किटेक्ट शेती करत असले तरी त्यांना लाभार्थी समजलं जाणार नाही. या योजनेचा फायदा मिळवण्यासाठी कृषी विभागात नोंदणी करावी लागणार आहे. प्रशासन त्या नोंदणीची खातरजमा करणार आहे. परंतु त्यासाठी आवश्यक कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. ज्यात सातबारावरच्या नोंदणीत जमीन मालकाचं नाव, सामाजिक वर्गीकरण(अनुसूचित जाती/जमाती), आधार नंबर, बँक अकाऊंट नंबर, मोबाईल नंबर द्यावा लागणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी