शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

मोदींना जंगल सफारी घडवणारी व्यक्ती आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 4:16 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच जंगल सफारीवर जाणार आहेत.

नवी दिल्लीः  पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच जंगल सफारीवर जाणार आहेत. विशेष म्हणजे त्यांना डिस्कव्हरीवरच्या मॅन व्हेर्सेस वाइल्ड या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. मोदी जंगल सफारीवर येणार असल्याची माहिती बेअर ग्रिल्सनेच ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. बेअरच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर त्याच्याच नावाची सर्वाधिक चर्चा आहे. ट्विटरवर या कार्यक्रमासंदर्भातील #PMModionDiscovery, तर Bear Grylls हे दोन्ही हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहेत.मोदींबरोबर दिसणाऱ्या या बेअरचा आतापर्यंतचा प्रवास वाखाणण्याजोगा आहे.  ट्विट करत तो म्हणाला, ‘जगभरातील 180 देशांच्या जनतेला मोदींची या आधी कधीही उजेडात न आलेली बाजू दिसेल. प्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी मोदी जंगल सफारीत आपल्याला पाहायला मिळतील. मोदींसोबतचा मॅन व्हेर्सेस वाइल्ड हा कार्यक्रम डिस्कव्हरी इंडियावर 12 ऑगस्ट रोजी 9 वाजता पाहण्याचं त्यानं आवाहन केलं आहे. ‘डिस्कव्हरी’वरील ‘मॅन व्हेर्सेस वाइल्ड’ हा शो अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. नैसर्गिक संसाधनांचा वापर करून जंगलातून कशा प्रकारे आपल प्रवास करू शकतो हे या कार्यक्रमात दाखवण्यात आलं आहे. या कार्यक्रमात साप, विंचू, मगरींचा जिवंत थरार अनुभवास मिळतो. बेअर ग्रिल्सच्या जीवघेण्या कसरतींमुळेच या कार्यक्रमात एक प्रकारचा थरार दिसतो. कोण आहे बेअर गिल्स ?बेअर वयाच्या 23व्या वर्षी पहिल्यांदाच मीडियाच्या समोर आला. 1998 रोजी त्यानं जगातील सर्वात उंच शिखर असलेलं माऊंट एव्हरेस्ट सर केला असून, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डनंही त्याची नोंद घेतली होती. 90 दिवसांमध्ये तो एव्हरेस्ट शिखरवर चढला होता. एडव्हर्ड मिशेल ग्रिल्स हे बेअरचे खरे नाव असून, त्याच्या मोठ्या बहिणीने त्याला ‘बेअर’ हे टोपण नाव दिले होते. बेअरने कराटेचे धडे गिरवले असून, त्याच्याकडे कराटेमधील ब्लॅक बेल्ट आहे. बेअर तीन वर्ष ब्रिटिश स्पेशल एअर सर्व्हिसमधील ‘एसएएस 21’ दलात कार्यरत होता. बेअरने लिहिलेल्या ‘फेसिंग अप’ या पहिल्याच पुस्तकाला वाचकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं.2012ला बेअरने ‘मड, स्वेट ऍण्ड टीअर्स : द ऑटोबायोग्राफी’ या नावाने आत्मचरित्र लिहिलं. त्यानंतर 2006 साली त्याला ‘मॅन व्हेर्सेस वाइल्ड’मध्ये काम करण्याची संधी मिळाली. अमेरिकेतील प्रदर्शनानंतर हा कार्यक्रम ‘डिस्कव्हरी’ने जगभरातल्या 200 देशांत दाखवला. 2006 ते 2011 या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये ‘मॅन व्हेर्सेस वाइल्ड’चे सात सिझन प्रदर्शित करण्यात आले. सर्व भागांमध्ये बेअरच नैसर्गिक परिस्थितींशी दोन हात करताना दिसला. बेअर विवाहित असून, त्याला तीन मुले आहेत. जेसी, मार्माड्युके आणि हकलबेरी अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी