शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

भितीने पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रवेशद्वार केले बंद किशोर चौधरी खून प्रकरण : अधीक्षक कार्यालयात आणला जाणार होता मृतदेह; आरोपींची संख्या पोहचली १४

By admin | Updated: March 11, 2016 22:26 IST

जळगाव : सागर चौधरी याचा भाऊ किशोर मोतीलाल चौधरी (रा.चौघुले प्लॉट,जळगाव) यांच्यावर शुक्रवारी दुपारी तीन वाजता महानुभाव पंथाच्या विधीनुसार शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी आरोपींवर कारवाई करावी या मागणीसाठी किशोर यांचा मृतदेह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आणण्यात येणार असल्याची माहिती मिळताच भीतीने पोलीस अधीक्षक कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ पोलीस दलावर आली होती. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

जळगाव : सागर चौधरी याचा भाऊ किशोर मोतीलाल चौधरी (रा.चौघुले प्लॉट,जळगाव) यांच्यावर शुक्रवारी दुपारी तीन वाजता महानुभाव पंथाच्या विधीनुसार शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी आरोपींवर कारवाई करावी या मागणीसाठी किशोर यांचा मृतदेह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आणण्यात येणार असल्याची माहिती मिळताच भीतीने पोलीस अधीक्षक कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ पोलीस दलावर आली होती. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सागर चौधरीचे निवासस्थान व प्रजापत नगरातील स्मशानभूमीत पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

गुरुवारी दुपारी पावणे दोन वाजता किरकोळ वादातून किशोर चौधरीवर सुरेश दत्तात्रय सोनवणे व उमेश कांडेलकर यांनी बर्फ फोडण्याच्या टोचाने हल्ला केला होता. यात उपचार सुरूअसताना त्याचा मृत्यू झाला होता. इनकॅमेरा शवविच्छेदनाची मागणी झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री सव्वा बारा वाजता किशोरचा मृतदेह जिल्हा रुग्णालयातून धुळे येथे नेण्यात आला होता.

इन्फो-
धुळ्यात मृतदेह घेण्यास नकार
धुळे येथे सकाळी दहा ते अकरा या वेळेत इनकॅमेरा शवविच्छेदन झाल्यानंतर सागर चौधरी यांनी मृतदेह घेण्यास नकार दिला, ही बाब धुळे येथे गेलेल्या पोलीस कर्मचार्‍यांची शनिपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक आत्माराम प्रधान यांना भ्रमणद्धनीवरुन कळवली, त्यानुसार प्रधान यांनी सागरशी संपर्क साधून मृतदेहाची विटंबना होवू शकते, पोलीस तपासात कमी पडलेले नाहीत व पुढेही कमी पडणार नाहीत असे सांगून मृतदेह घेण्याची विनंती केली. तरीही नातेवाईक अडून बसल्याने या प्रकरणी तुमच्यावर गुन्हा दाखल होवू शकतो, याची कल्पना दिल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.

एस.पी.कार्यालयाचे प्रवेशद्वार केले बंद
धुळे येथून साडे अकरा वाजता मृतदेह घेवून येणारी गाडी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात आणली जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी अधिकार्‍यांची बैठक बोलावल्याने नवा वाद होवू शकतो, या भीतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात चे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. तसेच तेथे येणारे सर्व अंतर्गत व उपरस्त्यावर तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. शहरचे निरीक्षक नवलनाथ तांबे, जिल्हा पेठचे शाम तरवाडकर व वाहतूक शाखेचे चंद्रकांत सरोदे यांच्यावर ही जबाबदारी निि›त करण्यात आली होती.