शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

ना ट्रॅक्टर, ना शस्त्रे, ना आंदोलन...दिल्लीतील महापंचायतीसाठी शेतकऱ्यांना सशर्त परवानगी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 20:08 IST

Kisan Mahapanchayat in Ramleela Maidan: दिल्लीतील रामलीला मैदानावर 14 मार्च रोजी संयुक्त किसान मोर्चाची महापंचायत होत आहे.

Kisan Mahapanchayat in Ramleela Maidan: दिल्लीतील रामलीला मैदानावर उद्या, (14 मार्च) होणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाच्या महापंचायतीला (Kisan Mahapanchayat) दिल्लीपोलिसांनी परवानगी दिली आहे. पण, संयुक्त किसान मोर्चाला महापंचायत घेऊ देण्यासाठी अनेक अटीही घालण्यात आल्या आहेत.

रात्री कुणालाही राहता येणार नाहीपोलिसांच्या अटींनुसार, पंचायतीच्या वेळी रामलीला मैदानात 5000 पेक्षा जास्त लोक थांबू शकणार नाहीत. कोणीही ट्रॅक्टर ट्रॉली आणणार नाही. कोणत्याही प्रकारची शस्त्रे सोबत ठेवता येणार नाहीत. हा कार्यक्रम सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत चालेल, त्यानंतर सर्वांना परत जावे लागेल. रात्री कोणालीही रामलीलावर राहता येणार नाही. 

किसान मोर्चाच्या नेत्यांचा होकारपोलिसांनी दिलेल्या सशर्त परवानगीनुसार, कोणत्याही प्रकारची रॅली किंवा निदर्शने करता येणार नाहीत. युनायटेड किसान मोर्चाच्या नेत्यांनी या अटींवर सह्या केल्या, त्यानंतर दिल्ली पोलिसांनी एनओसी देऊन परवानगी दिली आहे. पोलिसांनी सर्व शेतकरी नेत्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहनदेखील केले आहे.

दिल्ली वाहतूक पोलिसांनी जारी केली ॲडव्हायझरी दिल्ली वाहतूक पोलिसांनी एक ट्रॅफिक ॲडव्हायजरी जारी केली आहे. 14 मार्च 2024 रोजी रामलीला मैदानावर होणाऱ्या किसान महापंचायतीमुळे वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे संबंधित मार्गाऐवजी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांच्या सल्ल्यानुसार, गुरुवारी सकाळी 6 ते दुपारी 4 या वेळेत जवाहरलाल नेहरू मार्ग, बहादूर शाह जफर मार्ग, असफ अली रोड, स्वामी विवेकानंद मार्ग, नेताजी सुभाष मार्ग, मिंटो रोड, महाराजा रणजीत मार्ग, सिंग फ्लायओव्हर, भवभूती मार्ग, चमन लाल मार्ग, बाराखंबा रोड, टॉलस्टॉय मार्ग, जयसिंग रोड, संसद मार्ग, बाबा खरक सिंग मार्ग, अशोक रोड, कॅनॉट सर्कस आणि डीडीयू मार्गावर वाहतूक कोंडी असेल. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीPoliceपोलिस