शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
2
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
3
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
4
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
5
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
6
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
7
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
8
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
9
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
10
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
11
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
12
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
13
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
14
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
15
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
16
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
17
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
18
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
19
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
Daily Top 2Weekly Top 5

'देशानं बांगड्या भरलेल्या नाहीत...'; राकेश टिकैतांच्या वक्तव्यावर बॉलीवुड डायरेक्टर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 08:08 IST

यापूर्वीही अशोक पंडित यांनी राकेश टिकैत यांच्यावर निशाणा साधला आहे. अशोक पंडित यांनी मार्च महिन्यातही टिकैतांच्या वक्तव्यावर टीका केली होती.

नवी दिल्ली- तिनी केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांतील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिल्ली-एनसीआरच्या सीमेवर (टीकरी, सिंघू, शाहजहांपूर आणि गाजीपूर) बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पुढील आठवड्यात 8 महिने होतील. यातच, उत्तर प्रदेशच्या रामपूरमधून शेतकरी आंदोलनासंदर्भात भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांचे पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य समोर आले आहे. (kisan Andolan Bollywood director Ashok Pandit furious on rakesh tikaits statement and said the country has not worn bangles)

"शेतकरी तर परत येणार नाही, शेतकरी तेथेच राहतील. सरकारने चर्चा करायला हवी. 5 सप्टेंबरला मोठी पंचायत बोलावली आहे. पुढचा जो काही निर्णय असेल, त्यात घेऊ. सरकारकडेही दोन महिन्यांचा कालावधी आहे. सरकारही निर्णय घेऊ शकते, शेतकरीही करतील. देशात लढाई होईल, असे वाटते, की युद्ध होणार," असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.

टिकैतांच्या याच वक्तव्यावर, फिल्‍ममेकर आणि इंडियन फिल्‍म अँड टीवी डायरेक्‍टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित (Ashoke Pandit) भडकले आहेत. बॉलीवुडमधील प्रसिद्ध डायरेक्टर अशोक पंडित यांनी राकेश टिकैत यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे, की 'खलिस्तान्यांच्या आणि पाकिस्तानच्या पैशांनी देशाविरोधात युद्ध करण्याची यांची इच्छा आहे! देशानं बांगड्या भरलेल्या नाहीत टिकैत जी!" 

यापूर्वीही अशोक पंडित यांनी अनेक वेळा ट्विट करत राकेश टिकैत यांच्यावर निशाणा साधला आहे. अशोक पंडित यांनी मार्च महिन्यातही राकेश टिकैतांच्या वक्तव्यावर टीका केली होती. तेव्ह, आपण आंदोलन स्थळावरच कोरोना लस घेणार, असे टिकैत म्हणाले होते. एवढेच नाही, तर येथील प्रत्येक आंदोलकाला कोरोना लस टोचावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. यावर अशोक पंडित यांनी ट्विट करत, हा काही 'हलवा' नाही, असे म्हटले होते.

...तर आमचे २०० लोक संसदेजवळ धरणे आंदोलन करतील - तत्पूर्वी, कृषी कायद्यांवर चर्चा करण्याची केंद्र सरकारची इच्छा असेल तर चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, असे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सांगितले. मात्र, चर्चेतून मार्ग न निघाल्यास २२ जुलैपासून आमचे २०० लोक संसदेजवळ धरणे आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलनFarmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीbollywoodबॉलिवूड