शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राहुल गांधी बाईकने लडाखच्या पॅंगॉन्ग तलावावर पोहोचले, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांना 'धन्यवाद' म्हटले? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 09:01 IST

राहुल गांधी यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी पॅंगोंग त्सो येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी लडाख दौऱ्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. राहुल गांधी यांनी लडाखच्या बाईकवरुन केलेल्या राईडचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. या फोटोवरुन केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी ट्विट करुन राहुल गांधी यांचे 'धन्यवाद' मानले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिमालयीन प्रदेशात बांधलेल्या उत्कृष्ट रस्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोहीम सुरू केली. त्याबद्दल त्यांचे कौतुक केले, असं ट्विट रिजिजू यांनी केलं आहे.

मुंबई ते अहमदाबाद धावणार दुसरी ‘वंदे भारत’? प्रस्ताव दिल्लीला पाठविणार

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मागील यूपीए सरकारच्या कार्यकाळात सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेकडे लक्ष न दिल्याबद्दल राहुल गांधींचे लडाखमध्ये बाईक राइड केल्याबद्दल आभार मानले होते. रिजिजू यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आणि दावा केला की, हा २०१२ चा व्हिडीओ आहे. व्हिडिओमध्ये लडाखमधील पॅंगॉन्ग त्सोकडे जाणाऱ्या रस्त्यावर दगड पडताना दिसत आहेत आणि अनेक वाहने ते टाळण्याचा प्रयत्न करत आहेत.

यासोबतच मंत्री रिजिजू यांनी राहुल गांधींचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे, यामध्ये काँग्रेस राहुल गांधी बाईकवरुन राईड करत आहेत, यात मागे पॅंगॉन्ग त्सोकडे जाणारा रस्ता दिसत आहे. हा रस्ता अतिशय सुंदर आणि चकाचक दिसत आहे. रिजिजू यांनी ट्विटर वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'नरेंद्र मोदी सरकारने बनवलेल्या लडाखच्या उत्कृष्ट रस्त्यांचा प्रचार केल्याबद्दल राहुल गांधी तुमचे आभार.'

मंत्री रिजिजू म्हणाले की, यापूर्वी देखील राहुल गांधींनी काश्मीर खोऱ्यात पर्यटन कसे वाढत आहे हे दाखवले होते आणि सर्वांना आठवण करून दिली की, आता श्रीनगरच्या लाल चौकात शांततेने राष्ट्रध्वज फडकावता येईल. तसेच संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटवर लिहिले की, 'लेह आणि लडाखमधील कलम 370 हटवल्यानंतर झालेल्या घडामोडी पाहण्यासाठी आणि प्रचार करण्यासाठी राहुल गांधी स्वतः खोऱ्यात गेले आहेत. त्यांच्या रोड ट्रिपची झलक पाहून आम्ही उत्साहित आणि आनंदी आहोत.

राहुल गांधी शनिवारी लडाखच्या रस्त्यावर स्पोर्ट्स बाईक चालवताना दिसले. या रोमांचक प्रवासाचे फोटोही त्यांनी इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, पॅंगॉन्ग तलावाकडे जात आहे. राहुल गांधी दोन दिवसांच्या दौऱ्यावर गुरुवारी लेहला पोहोचले आणि नंतर पॅंगॉन्ग तलाव, नुब्रा व्हॅली आणि कारगिल जिल्हा कव्हर करण्यासाठी या प्रदेशातील आपला मुक्काम आणखी चार दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा