शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

Kiren Rijij : 'न्यायाधीशांनी विचार करुन बोलावं, टीका करताना भाषेची मर्यादा असावी'; किरेन रिजिजूंचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 3:57 PM

Kiren Rijij :कोणावरही टीका करण्यापर्यंत ठीक आहे पण टीका करताना भाषेची मर्यादा असावी. आपण कोणत्या प्रकारचे शब्द वापरतो, याकडे न्यायालयाने लक्ष दिले पाहिजे.

नवी दिल्ली: केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijij) यांनी न्यायपालिका, विधिमंडळ आणि निवडणूक आयोग यांच्यातील समन्वयावर बोलताना न्यायाधीशांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. 'न्यायाधीशांनी निवडणूक आयोगाबाबत सावधपणे बोलले पाहिजे, परिस्थिती समजून घेतली पाहिजे. न्यायव्यवस्था, विधिमंडळ आणि निवडणूक आयोग यांच्यात समन्वय असायला हवा, मात्र कोणाच्याही कामात हस्तक्षेप होता कामा नये', असे वक्तव्य रिजिजू यांनी केले आहे. ते मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

टीका करताना भाषेची मर्यादा असावीरिजिजू म्हणाले की, 'देशभरातील नागरिकांकडे मतदार कार्ड आहे आणि हे सर्वात महत्त्वाचे आह. केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या काही वर्षांत अप्रतिम काम केले आहे. माझा स्वत:चा गेल्या 7 निवडणुका लढवण्याचा अनुभवही खूप चांगला आहे. यामुळेच भारताची लोकशाही मजबूत होते. कोणावरही टीका करण्यापर्यंत ठीक आहे पण टीका करताना भाषेची मर्यादा असावी. आपण कोणत्या प्रकारचे शब्द वापरतो, याकडे न्यायालयाने लक्ष दिले पाहिजे. प्रत्येकजण आपापले काम करत आहे. कठोर टीका करण्यात काही नुकसान नाही, परंतु चांगल्या कृतींचे कौतुकदेखील केले पाहिजे', असेही ते म्हणाले.

आयोगाचे काम कौतुकास्पद

रिजिजू पुढे म्हणाले, 'न्यायमूर्तींनी निवडणूक आयोगाबाबत सावधपणे बोलावे. परिस्थिती समजून घेतली पाहिजे. आगामी काळात आणखी निवडणूक सुधारणा केल्या जातील, पण आयोगावर टीका योग्य नाही. कोविड-19 दरम्यान निवडणूक आयोगाने ज्या प्रकारचे काम केले, ते कौतुकास्पद आहे. आयोगाने लोकशाही व्यवस्थेत अडचण येऊ दिली नाही, अशा स्थितीत आयोगावर टीका करणे योग्य नाही, असे ते म्हणाले.

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये

याावेळी कार्यक्रमात उपस्थित असलेले मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र म्हणाले, मतदान हा एक महत्त्वाचा नागरी हक्क आहे आणि यातून लोकशाही राज्यघटनेवरचा विश्वास दिसून येतो. निवडणुकीत सर्व मतदारांचा सहभाग महत्त्वाचा आहे. सध्या देशात 95.3 कोटी मतदार आहेत. यंत्रणेअभावी कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, हा आमचा मुख्य उद्देश आहे.  कोविड-19 काळात आयोगाने अपवादात्मक परिस्थितीत काम केले, ज्याचे जगभरातून कौतुक होत आहे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदान