रेल्वेला धडकून माशे येथे महिला ठार
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
काणकोण : काणकोण-माशे येथे सकाळी चर्चमध्ये प्रार्थनेला जाताना रेल्वे ओव्हरब्रिजवर रेल्वेला धडकल्याने आग्नेस आफोन्सो (वय ५३) हिचा मृत्यू झाला. त्या लोलये-पोळे पंचायतीच्या माजी सरपंच होत.
रेल्वेला धडकून माशे येथे महिला ठार
काणकोण : काणकोण-माशे येथे सकाळी चर्चमध्ये प्रार्थनेला जाताना रेल्वे ओव्हरब्रिजवर रेल्वेला धडकल्याने आग्नेस आफोन्सो (वय ५३) हिचा मृत्यू झाला. त्या लोलये-पोळे पंचायतीच्या माजी सरपंच होत.सकाळी ६.२0 वाजण्याच्या सुमारास माशे येथून तीन महिला गालजीबाग येथील सेंट अँथनी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जात होत्या. त्या माशे येथील रेल्वे ओव्हरब्रिजवर पोहोचल्या असता, त्याच वेळेला मडगाव-मेंगलोर रेल्वे ओव्हरब्रिजवर आली. तत्काळ सर्व महिला बाजूला झाल्या. मात्र, आग्नेस हिने साडी परिधान केल्याने तिचा पदर रेल्वेच्या वार्याने ओढला गेला व ती बाजूला फेकली गेली. सुमारे २0 ते ३0 फूट खाली गडगडत गेल्याने ती घटनास्थळीच गतप्राण झाली.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह चिकित्सेसाठी पाठविला आहे. (लो.प्र.)ढँङ्म३ङ्म : 1402-टअफ-02कॅप्शन: आग्नेस आफोन्सो