शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Video : 'मध्यान्ह भोजनात अंडी खाल्ल्यामुळे मुलं नरभक्षक होतील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 10:00 IST

मध्य प्रदेश सरकारने अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांसाठी मध्यान्ह  भोजनात अंडी देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

ठळक मुद्देगोपाळ भार्गव यांनी ही मध्यान्ह भोजनात देण्यात येणाऱ्या अंड्यांवरून सरकारवर निशाणा साधला आहे मध्यान्ह भोजनात देण्यात येणारी अंडी खाल्ल्यामुळे मुलं नरभक्षक होतील असं अजब विधान भार्गव यांनी केलं.भाजपाच्या अनेक नेत्यांनी सरकारच्या या प्रस्तावावर टीका केली आहे.

भोपाळ - मध्य प्रदेश सरकारने अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांसाठी मध्यान्ह  भोजनात अंडी देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सरकारच्या या प्रस्तावावर भाजपाची अनेक नेतेमंडळी टीका करत आहेत. भाजपाचे नेते गोपाळ भार्गव यांनी ही मध्यान्ह भोजनात देण्यात येणाऱ्या अंड्यांवरून कमलनाथ सरकारवर निशाणा साधला आहे. मध्यान्ह भोजनात देण्यात येणारी अंडी खाल्ल्यामुळे मुलं नरभक्षक होतील असं अजब विधान भार्गव यांनी केलं आहे.

भार्गव यांनी भारताच्या संस्कृतीत जे सनातन संस्कार आहेत. त्यामध्ये मांसाहार करणं निषिद्ध आहे. जर तुम्ही मुलांना लहानपणापासूनच अंडी खाण्यासाठी दिली तर ते मोठे होऊन नरभक्षक होतील असं अजब विधान केलं आहे. 'एका कुपोषित सरकारकडून आणखी काय अपेक्षा करणार? मुलांना अंडी खाण्यासाठी दिली जातील. मात्र जी मुलं अंडी खाणार नाहीत त्यांना जबरदस्तीने ते खायला सांगणार. मुलं कुपोषित राहिली तर त्यांना चिकन, मटण देखील भरवलं जाईल. भारताच्या संस्कृतीत जे सनातन संस्कार आहेत. त्यामध्ये मांसाहार करणं निषिद्ध आहे. जर तुम्ही मुलांना लहानपणापासूनच अंडी खाण्यासाठी दिली तर ते मोठे होऊन नरभक्षक होतील 'असं भार्गव यांनी म्हटलं आहे. 

मध्य प्रदेशच्या महिला आणि बालकल्याण मंत्री इमरती देवी यांनी कुपोषणाशी लढण्यासाठी नोव्हेंबरपासून मध्यान्ह भोजनात अंड्यांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये अंगणवाडीतील मुलांना आणि गर्भवती महिलांना अंडी देण्यात येणार आहेत. भाजपाच्या अनेक नेत्यांनी सरकारच्या या प्रस्तावावर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक आयोगाच्या आदेशावरून भाजपाचे नेते गोपाल भार्गव यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. 

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. एल. कांथा राव यांनी दिले्या माहितीनुसार भार्गव यांनी केलेल्या विधानामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यानंतर त्याची नोंद घेत जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार 30 सप्टेंबरच्या रात्री गुन्हा दाखल झाला होता. मध्यप्रदेश विधानसभेत भार्गव हे विरोधी पक्षनेते आहेत. ही पोटनिवडणूक काही सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यातील नसून ती पाकिस्तान आणि भारत यांच्यातील लढाई आहे, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न भार्गव यांनी केला होता. 

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा