शहरं
Join us  
Trending Stories
1
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
2
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
3
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
4
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
5
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
6
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
7
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
8
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
9
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
10
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
11
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली
12
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
14
"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
15
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
16
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
17
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
18
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
19
IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?
20
कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांनी दिला हिशेब, म्हणाले, "जरा सबुरीने घ्या..."

Kia लवकरच छोटी एसयुव्ही लाँच करणार; जाणून घ्या किंमत किती असणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 15:09 IST

किया मोटर्स Kia Sonet SUV लवकरच लाँच करणार आहे. त्याआधी कंपनीने सोनेटचा टिझर लाँच केला आहे. 

नवी दिल्ली : Kia कंपनीने गेल्या वर्षी भारतातील कंपन्या मंदीच्या फेऱ्यात असताना किया सेल्टॉस लाँच करत धुमाकूळ उडवून दिला होता. आता पुन्हा एकदा कोरोना मंदीच्या सावटात किया छोटी एसयुव्ही भारतीय रस्त्यांवर आणणार आहे. किया मोटर्स Kia Sonet SUV लवकरच लाँच करणार आहे. त्याआधी कंपनीने सोनेटचा टिझर लाँच केला आहे. 

Kia Sonet वरून येत्या 7 ऑगस्टला पडदा हटविला जाणार आहे. सोनेटचे कन्सेप्ट मॉडेल ऑटो एक्स्पोमध्ये दाखविण्यात आले होते. कॉन्सेप्टच्या तुलनेत फायनल मॉडेलमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. टीझरमध्ये स्पष्ट झाले आहे की, एसयुव्हीची रॅपअराऊंड टेललाईट युनिट कॉन्सेप्ट मॉडेलसारखेच आहे. यामध्ये एलईडी देण्यात आले आहे. 

याशिवाय टीझरमध्ये सोनेट एसयुव्ही शार्प रिअर विंड स्क्रीन, रुफ रेल्स, रुफ माऊंटेड लिप स्पॉयलर, रिएर वायपर आणि रिअर सेट अँटेना असल्याचे दिसत आहे. किया सोनेट भारतीय बाजारात मारुतीची ब्रेझा, ह्युंदाईची व्हेन्यू, फोर्ड इकोस्पोर्ट, टाटा नेक्सॉनला कडवी टक्कर देणार आहे. कियामध्ये या सेगमेंटमधील पहिले फिचर असणार आहेत. 10.25-इंचाची मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, कियाची UVO कार कनेक्टेड टेक्नॉलॉजी, प्रीमियम Bose साउंड सिस्टिम आणि सनरुफ सारखे फिचर देण्यात आले आहेत. 

इंजिन कोणते?किया सोनेटचे इंजिन ह्युंदाई व्हेन्यूसारखे दिले जाण्याची शक्यता आहे. 1.2 लीटर पेट्रोल, 1.5 लीटर डिझेल आणि 1.0 लीटर GDi टर्बो-पेट्रोल इंजिन आहे. यासोबतच मॅन्युअल, ड्युअल क्लच अॅटोमॅटीक गिअरबॉक्स देण्यात येणार आहे. 

किंमत किती असेल? किया सोनोटची किंमत 7 ते 12 लाखांच्या आसपास ठेवली जाऊ शकते. या नव्या एसयुव्हीला सप्टेंबरमध्ये लाँच केले जाण्याची शक्यता आहे. 

कियाची कार्निव्हल

कार्निव्हल या कारमध्ये ड्युअल पॅनल इलेक्ट्रॉनिक सनरूफ देण्यात आलेला आहे. जे भारतातील कोणत्याही कारमध्ये नाही.  Kia Carnival मध्ये 202 लीटरचे डिझेल 4 सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 198 एचपी ताकद आणि 440 एनएमचा टॉर्क उत्पन्न करते. यामध्ये 8 स्पीड ऑटोमॅटीक ट्रान्समिशन मिळणार आहे. आणखी एक भन्नाट फिचर म्हणजे या कारमध्ये लॅपटॉप किंवा तत्सम उपकरणही चार्ज करता येणार आहे. कार्निव्हलची किंमत 24. 95 लाखांपासून सुरू होत असून 7, 8 आणि 9 सीटर अशीही ही एमयुव्ही मिळणार आहे. सर्वात महाग मॉडेल लिमोझिनची किंमत 33.95 लाख रुपये ठेवण्यात आले आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

करलो 5G मुठ्ठी में! Reliance Jio धमाका करणार; या शहरांत सर्वप्रथम मिळणार पण...

4-5 लोकांकडेच बॉलिवूडचा कंट्रोल; गोविंदाने केले गंभीर आरोप

कर्मचारी कपात! देशातील सर्वात मोठी विमान कंपनी हवालदिल; 10 टक्के नोकऱ्या जाणार

लेखी परीक्षा नाही! उच्च न्यायालयात नोकरीची संधी; क्लार्क पदासाठी 102 जागांवर भरती

...तर 'ढोंगी' TikTok ला भारतात प्रवेश मिळू शकतो? चिनी कंपनीचे मोठे कारस्थान

भारत vs चिनी 'राफेल'! सामना रंगला; पहा कोण जादा शक्तीवान?

Sarkari Nokari : थेट सातवा वेतन आयोग; केंद्र सरकारने काढली पोलिसांची बंपर भरती

टॅग्स :Kia Motars Carsकिया मोटर्स