शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

रायन स्कूलमधील प्रद्युम्न हत्या प्रकरणात सीबीआय चौकशीसाठी खट्टर सरकार तयार, नितीश कुमारांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 14:40 IST

गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल शाळेत शिकणाऱ्या सात वर्षीय प्रद्युम्नच्या हत्या प्रकरणाला खट्टर सरकारनं सीबीआय चौकशीसाठी परवानगी दिली आहे. वाढत्या दबावाखातर खट्टर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. प्रद्युम्नच्या हत्येची कुटुंबीयांना अपेक्षित असणारी चौकशी करणार, असं आश्वासनही हरणायाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी प्रद्युम्नचे वडील वरुण ठाकूर यांना दिलं आहे.

चंदीगड, दि. 11 -  गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल शाळेत शिकणाऱ्या सात वर्षीय प्रद्युम्नच्या हत्या प्रकरणाला खट्टर सरकारनं सीबीआय चौकशीसाठी परवानगी दिली आहे. वाढत्या दबावाखातर खट्टर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. प्रद्युम्नच्या हत्येची कुटुंबीयांना अपेक्षित असणारी चौकशी करणार, असं आश्वासनही हरणायाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी प्रद्युम्नचे वडील वरुण ठाकूर यांना दिलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रद्युम्न हत्या प्रकरणात मनोहर लाल खट्टर यांच्याशी फोनवरून बातचीत केली आहे.नितीश पत्रकारांना म्हणाले, माझी खट्टर यांच्याशी चर्चा झाली आहे. तसेच त्यांना प्रद्युम्नच्या घरी भेट देण्याचीही विनंती केली आहे. त्यामुळे प्रद्युम्नच्या कुटुंबीयांना  एक प्रकारची ताकद मिळेल. त्यांना आपल्यासोबत कोणीतरी असल्याचं वाटेल. तसेच प्रद्युम्नच्या हत्येत दोषी असलेल्यांना कडक शिक्षा करणार असल्याचंही खट्टर यांनी आश्वासन दिल्याचं नितीश कुमार म्हणाले आहेत. तसेच प्रद्युम्न हत्या प्रकरणाला जबाबदार असलेल्या रायन पिंटो यांनीही जामिनासाठी अर्ज केला आहे.  प्रद्युम्नच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत शाळा व्यवस्थापनेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. रायन इंटरनॅशनलचे रिजनल हेड आणि एचआर हेड यांना अटक करण्यात आली असून त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. या प्रकरणात सोहना पोलीस ठाण्याच्या एसएचओंना निलंबित करण्यात आलं आहे. रायन इंटरनॅशनल शाळा मंगळवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

तपासात अनेक त्रुटी मुलाच्या हत्येला दोन दिवस झाले पण अजूनही खरं काय आहे ते समोर आलं नाही. हत्या का झाली यामागील सत्य समोर यावं, हीच माझी इच्छा आहे. स्थानिक पोलीस करत असलेल्या तपासातून काही गोष्टी सुटल्या आहेत. म्हणूनच या घटनेची सीबीआय चौकशी व्हायला हवी. स्थानिक पोलीस करत असलेल्या तपासावर मी समाधानी नसून मुलाच्या हत्येप्रकरणाचा सविस्तर तपास हवा आहे. स्थानिक पोलीस करत असलेल्या तपासात अनेक त्रुटी आहे. म्हणूनच सीबीआयने तपास करायला हवा, असं प्रद्युम्नच्या वडिलांनी म्हटलं आहे. प्रद्युम्नच्या आईचा आत्महत्येचा इशारारायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये हत्या झालेल्या प्रद्युम्न ठाकूरच्या आईने आत्महत्येचा इशारा दिला आहे. प्रद्युम्नच्या खऱ्या मारेकऱ्यांना पकडलं नाही, तर आत्महत्या करेन, असा इशारा प्राम्नच्या आईने दिला आहे. तर प्रद्युम्नचे वडील या प्रकरणाची दाद सुप्रीम कोर्टात मागणार आहेत.शुक्रवारी 8 सप्टेंबर रोजी प्रद्युम्नचा मृतदेह शाळेच्या शौचालयात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सापडला होता. या प्रकरणी शाळेच्या बस कंडक्टर अटक करण्यात आली आहे. पण या हत्येमागे कंडक्टर नसावा, कोणी अन्य यामागे आहे, असा आरोप प्रद्युम्नच्या आईने केला आहे. पोलीस कोणाला तरी वाचवण्यासा प्रयत्न करत आहेत. खरा आरोपी पकडला न गेल्यास आत्मदहनाचा इशारा प्रद्युम्नच्या आईने दिला आहे. आरोपी बसवाहक अशोक असं कृत्य करूच शकत नाही, अशी माहिती चालकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली आहे. त्याच्याकडे चाकूही नव्हता, असं चालकाचं म्हणणं आहे.