शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
5
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
6
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
7
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
8
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
9
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
10
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
11
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
12
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
13
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
14
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
15
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
16
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
17
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
18
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
19
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
Daily Top 2Weekly Top 5

खापरखेडा... हरीण

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

उपचाराअभावी पाडसाचा मृत्यू

उपचाराअभावी पाडसाचा मृत्यू
खापरखेडा : अपघातात गंभीर जखमी झालेल्या पाडसाला वेळीच योग्य उपचार मिळाले नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा - कामठी मार्गावर बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास निदर्शनास आली.
कैलास दौलत कामडी रा. शांतीनगर, नागपूर हे खापरखेडा - कामठी मार्गाने जात असताना त्यांना मार्गात पाडस जखमी अवस्थेत पडले असल्याचे आढळून आले. या पाडसाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्याच्या दोन्ही पायाचे हाड मोडल्याने त्याला उभेही होता येत नव्हते. दरम्यान, कैलास कामडी यांनी त्या पाडसाला उचलून लगेच खापरखेडा पेालीस ठाण्यात आणले. त्यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात बघ्यांनी एकच गर्दी केली होती. खापरखेडा पोलिसांनी सदर घटनेची नोंद केली. शिवाय पोलीस शिपाई रोशन काळे व अमित उमाठे यांनी या जखमी पाडसाविषयी वन विभागाच्या खापा व नागपूर कार्यालयाला लगेच सूचना दिली. खापा कार्यालयातील वन विभागाचे अधिकारी एस. पुसदेकर यांच्याकडे वाहन नसल्याने ते खापरखेडा पोलीस ठाण्यात तब्बल दोन तास उशिरा पोहोचले. तोपर्यंत ते पाडस उपचाराअभावी गतप्राण झाले होते. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी त्या पाडसाचा पंचनामा केला आणि मृतदेह सोबत घेऊन गेले. पाडसाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला होता. (प्रतिनिधी)
***