शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कॅनडाच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमामध्ये खलिस्तानी दहशतवादी, पत्नी सोफीसोबत काढला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 12:19 IST

भारत दौऱ्यावर आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या कार्यक्रमाला खलिस्तानी दहशतवादी उपस्थित राहिल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमंगळवारी मुंबईत झालेल्या ट्रुडो यांच्या कार्यक्रमाल जसपाल अटवाल उपस्थित होता. जसपाल अटवालने पंजाब सरकारमधील मंत्र्याच्या हत्येचा प्रयत्न केला होता.

नवी दिल्ली - भारत दौऱ्यावर आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या कार्यक्रमाला खलिस्तानी दहशतवादी उपस्थित राहिल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. जस्टिन ट्रुडो यांच्या मुंबई आणि दिल्लीतील कार्यक्रमाचे जसपाल अटवाल या खलिस्तानी दहशतवाद्याला निमंत्रण गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. खलिस्तानी चळवळीशी संबंधित असलेल्यांना भेटण्यात आपल्याला अजिबात रस नाही असे ट्रुडो यांनी स्पष्ट केले होते. तरीही त्यांच्या कार्यक्रमाला खलिस्तानी दहशतवादी उपस्थित राहिल्याने कॅनडा सरकारची मोठी पंचाईत झाली आहे. 

मंगळवारी मुंबईत झालेल्या ट्रुडो यांच्या कार्यक्रमाल जसपाल अटवाल उपस्थित होता. ट्रुडो  यांची पत्नी सोफी आणि कॅनडा सरकारमधील मंत्री अमरजीत सोही यांच्यासोबत त्याने काढलेला फोटोही प्रसिद्ध झाला आहे. जसपाल अटवालने पंजाब सरकारमधील मंत्र्याच्या हत्येचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी त्याला 20 वर्षाची शिक्षाही ठोठावण्यात आली होती. 

ट्रुडो यांच्या दौऱ्यात आणखी वाद उदभवू नये यासाठी कॅनडाचे राजदूत नादीर पटेल यांनी आज रात्री दिल्लीत होणाऱ्या डिनर कार्यक्रमाचे जसपाल अटवालचे निमंत्रण रद्द केले आहे. आज सकाळी दिल्लीमध्ये पत्रकारांनी त्रिदेऊ यांना तुम्ही खलिस्तानी दहशतवाद्यांना का निमंत्रण दिले ? असा प्रश्न विचारला. त्यावर ट्रुडो यांनी उत्तर द्यायचे टाळले. 

अटवाल फुटीरतावादी चळवळीमध्ये सहभागी होता. बंदी घातलेल्या शीख युथ फेडरेशनचा तो सदस्य आहे. 1986 साली कॅनडामध्ये पंजाब सरकारमधील मंत्री मलकीयत सिंग सिंधू यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. त्या प्रकरणात जसपाल अटवालला न्यायालयाने दोषी ठरवून 20 वर्षाची शिक्षा सुनावली. कॅनडामध्ये झालेल्या हल्ल्यातून मलकीयत सिंधू बचावले होते पण नंतर पुढे भारतात त्यांची हत्या झाली.   

टॅग्स :Justin Trudeauजस्टीन ट्रुडो