शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

'केसीर अने नेनू', चंद्रशेखर राव यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 14:48 IST

तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी गुरुवारी दुपारी 1.30 वाजता शपथ घेतली.

हैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी गुरुवारी दुपारी 1.30 वाजता शपथ घेतली. तेलंगणात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीला घवघवीत यश मिळाले आहे. त्यानंतर, चंद्रशेखर राव हेच पुन्हा तेलंगणाचे मुख्यमंत्री बनणार हे निश्चित झाले होते. त्यानुसार चंद्रशेखर राव यांनी स्वतंत्र तेलंगणाचे सलग दुसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 

तेलंगणाचे राज्यपाल ई.एस.एल. नरसिम्हन यांनी राव यांना गोपनियतेची शपथ दिली. तर मोहम्मद अली यांनाही उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. बुधवारी तेलगंणातील नवनिर्वाचि आमदारांनी केसीआर यांना आपला गटनेता म्हणून एकमताने निवडले होते. त्यानंतर, आज हा शपथविधी सोहळा पार पडला. केसीआर यांच्या टीआरएस पक्षाने राज्यातील 119 जागांपैकी तब्बल 88 जागा जिंकल्या आहेत.

केसीआर यांनी येत्या मार्चपर्यंत राज्यातील एक कोटी एकर जमीन सिंचनाखाली आणण्याचे आश्वासन प्रचारात दिले. कालेश्वरम जलसिंचन प्रकल्प मुदतीत पूर्ण करण्यात येईल असेही त्यांनी ठासून सांगितले होते. अन्न, वस्त्र, निवारा यासंबंधीच्या आश्वासनांना जनता भुलते हे राजकारण्यांना माहीत असते. जनतेसाठी दोन बीएचके आकाराच्या दीड लाख घरांचे सुरू असलेले बांधकाम, निवडणूक आचारसंहितेमुळे कंत्राटदारांना निधी न मिळाल्याने थांबले होते. त्यांनी 2024 पर्यंत राज्यात साडेपाच लाख घरे बांधण्याचे आश्वासन दिले आहे. ही घरे वेगाने पूर्ण करून त्यांचा ताबा लोकांना लवकरात लवकर द्यावा लागेल. सुमारे अडीच कोटी लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी नळांची जोडणी, भागीरथी योजनेच्या अंतर्गत सर्वांना पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांना १ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी अशी अनेक आश्वासने केसीआरना मुख्यमंत्रीपदाच्या दुसºया कारकीर्दीत पूर्ण करावी लागतील. तीच त्यांच्यासाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे. टीआरएसला 46.38 टक्के मते मिळाली. गेल्या निवडणुकांत हे प्रमाण 34.04 टक्के होते.काँग्रेस, टीडीपी, सीपीआय, टीजीएस यांना मिळून गेल्या वेळी वेगळे लढूनही एकत्रितपणे 40.48 टक्के मते मिळाली होती. यंदा एकत्र लढूनही या पक्षांची मते 8 टक्क्यांनी घसरून 32.69 टक्क्यांवर आली. म्हणजेच तिथे जी महाआघाडी झाली होती, ती आपला प्रभाव पाडूच शकली नाही.

 

टॅग्स :TelanganaतेलंगणाTelangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018