शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

केरळच्या तरुणाला 25 कोटींची लॉटरी जिंकल्याचा पश्चाताप; दररोज हा त्रास सहन कारावा लागतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 13:57 IST

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 31 वर्षीय अनुपने 25 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली, पण त्याला आता पश्चाताप होतोय.

Kerala Lottery News : गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 31 वर्षीय अनुप एम या तरुणाने 25 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली होती, परंतु आता त्याला लॉटरी जिंकल्याचा पश्चाताप होतोय. लॉटरी जिंकल्यापासून त्याला सातत्याने लोक आर्थिक मदतीची मागणी करत आहेत. या लोकांमुळे त्रस्त झाल्याचे अनुपने सांगितले. अनुप सध्या राज्य सरकारच्या लॉटरी व्यवसायात काम करतो आणि केरळमधील एकमेव करोडपती लॉटरी एजंट आहे.

अनूप आधी ऑटो ड्रायव्हर होता, पण आता तो केरळ स्टेट लॉटरीच्या अनुक्रमांकांची यादी करण्यात आणि ग्राहकांना त्यांची तिकिटे विकण्याचे काम करतो. त्याच्या नवीन लॉटरी शॉप एम ए लकी सेंटरमध्ये त्याचा आयफोन सतत त्याच्या कानावर असतो, कारण त्याला सतत ग्राहकांचे कॉल येत असतात. आज तो राज्यातील सर्वात व्यस्त लॉटरी एजंट आहे.

लॉटरी जिंकल्यानंतर अनेक समस्या आल्याअनुप हा केरळच्या लॉटरी इतिहासात सर्वात मोठा लॉटरी विजेता आहे. लॉटरी जिंकल्यापासून त्याला अनेक त्रास सहन करावे लागत आहेत. त्याला सतत कोणी ना कोमी आर्थिक मदत मागायला येतो. लोकांनी त्याच्या घरी गर्दी करू नये म्हणून तो सतत आपले निवासस्थान बदलत असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून लोकांची गर्दी कमी झाली आहे.

केरळ सरकारच्या लॉटरी व्यवसायातील मोठा चेहराअनूप आता केरळ सरकारच्या मालकीच्या लॉटरी व्यवसायाचा एक मोठा चेहरा बनला आहे. केरळ सरकारचा हा व्यवसाय आता दररोज अनेकांना करोडपती बनवत आहे. केरळ लॉटरी विभागाकडे एक लाखांहून अधिक नोंदणीकृत एजंट आहेत. त्यांच्या अंतर्गत अनेक नोंदणी नसलेले सब-एजंट आणि फेरीवाले आहेत, ज्यामुळे राज्यातील अनेक लाख लोकांना रोजगार मिळतो.

टॅग्स :KeralaकेरळMONEYपैसा