शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

नीति आयोगाच्या SDG निर्देशांकामध्ये केरळ अव्वल, तर बिहार शेवटच्या स्थानी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 16:04 IST

नीति आयोगाच्या निरंतर विकास लक्ष्य निर्देशांकामध्ये सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणाच्या क्षेत्रामधील राज्याच्या प्रगतीवरून त्या राज्याच्या कामगिरीचा आढावा घेतला जातो.

नवी दिल्ली - देशातील राज्यांचा निरंतर विकास लक्ष्य निर्देशांक (SDG index) नीति आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये निर्देशांकामध्ये केरळने अव्वलस्थान पटकावले आहे. तर बिहारला शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. केरळने एकूण 70 गुणांची कमाई करत केरळने अव्वलस्थान पटकावले आहे. तर 69 गुणांसह हिमाचल प्रदेश दुसऱ्या स्थानी राहिला आहे. केंद्रशासित प्रदेशांच्या क्रमवारीत चंदिगडने 70 गुणांसह अव्वलस्थान पटकावले आहे.  निरंतर विकास लक्ष्य निर्देशांकामधील राज्यांच्या क्रमवारीनुसार केरळ पहिले तर हिमाचल प्रदेशने दुसरे स्थान पटकावले. त्यानंतर आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगाणा या राज्यांनीही चांगली कामगिरी करत तिसरे स्थान पटकावले आहे. तर उत्तर प्रदेश, ओदिशा आणि सिक्कीम या राज्यांनी 2018 च्या तुलनेत उत्तम प्रगती केली आहे. मात्र गुजरातसह अन्य काही राज्यांच्या क्रमवारीत फारसा फरक पडलेला नाही.  

निरंतर विकास लक्ष्य निर्देशांकामध्ये बिहार मात्र पिछाडीवर पडला आहे. या निर्देशांकामधील राज्यांच्या क्रमवारीत बिहार 50 गुणांसह शेवटच्या स्थानी राहिला आहे. बिहारप्रमाणेच झारखंड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांचीही कामगिरी वाईट झाली आहे.  गरिबी निर्मुलनाच्या लक्ष्यामध्ये तामिळनाडूची उल्लेखनीय कामगिरी झाली आहे. तामिळनाडूप्रमाणेच त्रिपुरा, आंध्र प्रदेश, मेघालय, मिझोराम आणि सिक्कीम या राज्यांनीही गरिबी निर्मुलनामध्ये  उल्लेखनीय प्रगती केली आहे. तर राज्यातून उपासमार पूर्णपणे हद्दपार करण्यात गोवा, मिझोराम, केरळ, नागालँड आणि मणिपूर यांनी आघाडी घेतली आहे. नीति आयोगाच्या निरंतर विकास लक्ष्य निर्देशांकामध्ये सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणाच्या क्षेत्रामधील राज्याच्या प्रगतीवरून त्या राज्याच्या कामगिरीचा आढावा घेतला जातो. त्यावरून त्या राज्याचा क्रम ठरवला जातो. दरम्यान, ''संयुक्त राष्ट्रांचे 2030 चे SDG लक्ष्य भारताविना कधीही पूर्ण होऊ शकणार नाही. आम्ही आरोग्याच्याबाबतीत संयुक्त राष्ट्रांनी निर्धारित केलेले लक्ष्य गाठण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहोत, '' असे नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितले. ''भारताला पाणी, स्वच्छता आणि उद्योग क्षेत्रात लक्षणीय यश मिळाले आहे. मात्र पोषण आणि स्त्री पुरुष असमानता हे देशासमोरील मोठे आव्हान आहे. सरकारने त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.   

टॅग्स :IndiaभारतNIti Ayogनिती आयोगKeralaकेरळHimachal Pradeshहिमाचल प्रदेश