शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

निति आयोगाच्या शाश्वत विकास उद्दिष्टात केरळ अव्वल स्थानी; बिहार तळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 06:24 IST

केंद्रशासित प्रदेशांमध्ये चंदीगड पहिले ; बिहारची कामगिरी वाईट

नवी दिल्ली : निति आयोगाने निर्धारित केलेल्या ‘शाश्वत विकास उद्दिष्टे’(एसडीजी) निर्देशांकात २०२०-२१ मध्ये केरळने प्रथम स्थान पटकावले असून, बिहारची कामगिरी सर्वाधिक वाईट ठरली आहे. निति आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार यांनी गुरुवारी तिसरा एसडीजी निर्देशांक जारी केला. एसडीजी निर्देशांकात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या विकासाचे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणविषयक मापदंडांवर मूल्यमापन केले जाते. यात ७५ गुणांसह केरळ अव्वलस्थानी राहिला. हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडू यांनी ७४ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. बिहार, झारखंड आणि आसाम यांची कामगिरी सर्वाधिक वाईट राहिली.केंद्रशासित प्रदेशांत ७९ गुणांसह चंदीगड प्रथमस्थानी राहिले. ६८ गुण घेऊन दिल्ली दुसऱ्या स्थानी राहिली. २०२०-२१ मध्ये मिझोरम, हरयाणा आणि उत्तराखंड यांनी अनुक्रमे १२, १० आणि ८ गुणांची वाढ मिळवून कामगिरी सुधारणाऱ्या राज्यांत सर्वोच्च स्थान मिळविले.एकूण एसडीजी गुणांत भारताने ६ गुणांची सुधारणा केली आहे. २०१९ मध्ये भारताचे एकूण गुण ६० होते. ते २०२०-२१ मध्ये ६६ झाले आहेत. उद्दिष्ट-६ (शुद्ध पाणी व स्वच्छता) आणि उद्दिष्ट-७ (किफायतशीर व स्वच्छ ऊर्जा) यात चांगली सुधारणा झाल्याने ही गुणवाढ झाली आहे. या दोन्ही उद्दिष्टांत भारताला अनुक्रमे ८३ आणि ९२ गुण मिळाले आहेत.फ्रंट-रनर श्रेणीत महाराष्ट्राला स्थान२०१९ मध्ये १० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची ‘फ्रंट-रनर’ अशी एक स्वतंत्र श्रेणी तयार करण्यात आली होती. ६५ ते ९९ गुण असलेली राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा त्यात समावेश करण्यात आला होता. २०२०-२१ मध्ये ‘फ्रंट-रनर’ श्रेणीत आणखी १२ राज्ये समाविष्ट झाली. त्यात उत्तराखंड, गुजरात, महाराष्ट्र, मिझोरम, पंजाब, हरयाणा, त्रिपुरा, दिल्ली, लक्षद्वीप, अंदमान व निकोबार बेटे, जम्मू व काश्मीर आणि लडाख यांचा समावेश आहे.

टॅग्स :Keralaकेरळ