शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अनेक वर्षांची मागणी; केरळचे झाले ‘केरळम’, राज्याचे नाव का बदलले? जाणून घ्या इतिहास...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 20:00 IST

Kerala State Name: केंद्रीय मंत्रिमंडळाने केरळ राज्याचे नाव अधिकृतपणे ‘केरळम’ करण्यास मंजुरी दिली आहे.

Kerala State Name: केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी(दि.24) केरळ राज्याचे नाव अधिकृतपणे ‘केरळम’ करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर ‘केरळ’चे नाव बदलून ‘केरळम’ का करण्यात आले, यामागची कारणे काय आहेत आणि या नावाचा इतिहास काय सांगतो? याबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘केरळ’ ते ‘केरळम’: नावबदलाची सुरुवात कशी झाली?

24 जून 2024 रोजी केरळ विधानसभेने राज्याचे नाव ‘Kerala’ ऐवजी ‘Keralam’ करण्याचा ठराव मंजूर केला होता. या ठरावात नमूद करण्यात आले होते की, आमच्या राज्याचे नाव मलयाळम भाषेत ‘केरळम’ आहे. 1 नोव्हेंबर 1956 रोजी भाषिक आधारावर राज्यांची पुनर्रचना झाली. केरळ पिरावी दिवसही 1 नोव्हेंबरलाच साजरा केला जातो. स्वातंत्र्य चळवळीच्या काळापासून मलयाळम भाषिकांसाठी संयुक्त केरळची मागणी होती, मात्र संविधानाच्या पहिल्या अनुसूचीत राज्याचे नाव ‘Kerala’ असे नोंदवले गेले.”

भाषिक ओळख आणि मलयाळमचा मुद्दा

केरळ हे भाषिक आधारावर स्थापन झालेले राज्य आहे. येथील स्थानिक आणि मूळ भाषा मलयाळम असून, या भाषेत राज्याचे नाव ‘केरळम’ असेच उच्चारले जाते. स्थानिक लोक आजही आपल्या बोलीत ‘केरळम’ हा शब्द वापरतात. मात्र इंग्रजी वापरात ते ‘Kerala’ म्हणून रूढ झाले. यामुळे नावबदलाचा निर्णय हा केवळ प्रशासकीय न राहता भाषिक ओळखीचा प्रश्न ठरला आहे.

पौराणिक संदर्भ: परशुराम आणि समुद्रातून निर्माण झालेली भूमी

केरळच्या नावाशी संबंधित पौराणिक कथांमध्ये भगवान विष्णूंचे सहावे अवतार परशुराम यांचा उल्लेख आढळतो. केरळोपथी (केरळच्या लोककथांचा ग्रंथ) आणि अनेक पुराणांमध्ये या कथेचा संदर्भ आहे. मान्यतेनुसार, परशुरामांनी पृथ्वी महादेवांना दान केल्यानंतर तपश्चर्येसाठी भूमी मागितली. तेव्हा वरुणदेवांनी समुद्र मागे हटवला आणि परशुरामांनी फेकलेल्या परशूच्या टोकापर्यंत जी भूमी निर्माण झाली, ती म्हणजे आजचे केरळ. यातून ‘केर’ (जल) आणि ‘अलम’ (भूमी), म्हणजे पाण्यातून निर्माण झालेली भूमी, असा ‘केरळम’ शब्दाचा अर्थ सांगितला जातो.

अशोकाच्या शिलालेखांत ‘केरळपुत्र’चा उल्लेख

इतिहासाच्या दृष्टीने पाहिले असता, केरळ नावाचा सर्वात प्राचीन उल्लेख मौर्य सम्राट अशोक यांच्या इ.स.पू. तिसऱ्या शतकातील शिलालेखांमध्ये आढळतो. इतिहासकार डी.सी. सरकार यांच्या मते, या शिलालेखांत ‘केरळपुत्र’ असा शब्द वापरण्यात आला आहे, ज्याचा अर्थ ‘केरळचा शासक’ किंवा ‘केरळचा पुत्र’ असा होतो. इतिहासकार आर.सी. मजूमदार यांनीही Ancient India या पुस्तकात ‘केरळपुत्र’ या संबोधनाचा उल्लेख केला आहे.

चेरा राजवंश आणि ‘केरळ’ शब्दाची वाटचाल

दक्षिण भारताच्या इतिहासाचे अभ्यासक के.ए. नीलकंठ शास्त्री यांनी A History of South India या ग्रंथात चेरा, चोल आणि पांड्य राजवंशांचा उल्लेख केला आहे. त्यांच्या मते, ‘केरळ’ हे नाव चेरा राजवंशाशी संबंधित असण्याची शक्यता आहे. शास्त्री यांच्या मते, चेरा शासकांचा प्रदेश ‘चेरालम’ म्हणून ओळखला जाऊ लागला आणि काळानुसार तो ‘केरळम’ झाला. दक्षिण भारतीय भाषांमध्ये ‘च’ आणि ‘क’ या ध्वनींमध्ये होणारे बदल लक्षात घेतल्यास, ‘चेरा’ ते ‘केरा’ आणि पुढे ‘केरळ’ हा प्रवास स्वाभाविक वाटतो.

भाषाविज्ञानाचा दृष्टिकोन

भाषावैज्ञानिकांच्या मते, द्रविड भाषांमध्ये Palatalization आणि Velarization हे ध्वनीबदल सामान्य आहेत. मलयाळम, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमध्ये ‘च’ आणि ‘क’ ध्वनींचे परस्पर रूपांतर आढळते. उदाहरणार्थ- हिंदीतील ‘हाथ’ - तमिळमध्ये ‘कइ’ (Kai), तेलुगूमध्ये ‘चेइ’ (Chei). हिंदीतील ‘कान’ - तमिळ/तेलुगूमध्ये ‘चेवि’ (Chevi), कन्नडमध्ये ‘किवि’ (Kivi) यामुळे ‘चेरा’ ते ‘केरळ’ हा भाषिक प्रवास अधिक ठोस ठरतो. इतिहासकार ए. श्रीधर मेनन यांनीही केरळची ओळख चेरा राजवंशाशी घट्ट जोडलेली असल्याचे नमूद केले आहे. संगम साहित्यात चेरा शासक आणि त्यांच्या भूभागाचे उल्लेख आढळतात.

‘केरा’ म्हणजे नारळांची भूमी?

एक लोकप्रिय लोकमान्यता अशीही आहे की ‘केरा’ म्हणजे नारळ आणि ‘आलम’ म्हणजे स्थान. त्यामुळे ‘केरळ’ म्हणजे नारळांची भूमी. केरळचा किनारी भाग प्राचीन काळापासून नारळ उत्पादनासाठी प्रसिद्ध राहिला आहे. अरब व्यापारी आणि परदेशी प्रवाशांच्या वर्णनांतही येथील हिरवळ आणि नारळांची भरपूरता नमूद केली आहे. मात्र इतिहासकार या मताला लोकमान्यतेचा आधार मानतात; ठोस ऐतिहासिक पुरावा मानत नाहीत.

भूगोल आणि ‘चराल’ (पर्वतीय उतार) संकल्पना

भौगोलिक दृष्टीने पाहता, पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांपासून समुद्राकडे उतरणाऱ्या उताराला ‘चराल’ असे म्हटले जाते. या उतारांपासून तयार झालेल्या सपाट किनारी प्रदेशाशी ‘चेरालम’, ‘चेरळम’ आणि पुढे ‘केरळम’ हा शब्दप्रवास जोडला जातो. एकूणच, ‘केरळ’ हे केवळ भौगोलिक नाव नाही, तर ते दोन हजार वर्षांहून अधिक काळाच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भाषिक प्रवासाचे प्रतीक आहे. ‘केरळ’ ते ‘केरळम’ हा बदल केवळ एका अक्षराचा नाही, तर भाषिक अस्मितेच्या आणि सांस्कृतिक आत्मसन्मानाच्या पुनर्स्थापनेचा निर्णय म्हणून पाहिला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kerala Officially Renamed Keralam: Exploring the History Behind the Name Change

Web Summary : Kerala is now officially Keralam. The name change reflects a desire to align with the state's Malayalam linguistic identity. Historical connections to Chera dynasty, references in ancient texts, and geographical interpretations contribute to the name's rich heritage, marking a cultural restoration.
टॅग्स :KeralaकेरळCentral Governmentकेंद्र सरकार