शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचा कहर, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू, 'ही' आहेत लक्षणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 15:26 IST

Brain-Eating Amoeba Cases: केरळमध्ये अमीबिक इंसेफेलायटिस या दुर्मिळ आणि प्राणघातक आजाराने संक्रमित झालेल्या रुग्णांच्या मृत्युंची संख्या वाढत आहे.

केरळमध्ये अमीबिक इंसेफेलायटिस या दुर्मिळ आणि प्राणघातक आजाराने संक्रमित झालेल्या रुग्णांच्या मृत्युंची संख्या वाढत आहे. राज्यात आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामधून अनेक मृत्यू गेल्या काही आठवड्यात झाले असून, आरोग्य विभागाने नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

या वर्षी केरळमध्ये अमीबिक इंसेफेलायटिसचे ६१ रुग्ण आढळले आहेत, ज्यामध्ये १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी म्हटले की, केरळला सार्वजनिक आरोग्याच्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यांमध्ये या संसर्गाचे प्रमाण जास्त होते, परंतु आता संपूर्ण राज्यात अमीबिक इंसेफेलायटिसचे रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांमध्ये ३ महिन्यांच्या बाळापासून ते ९१ वर्षांच्या वृद्धापर्यंत समावेश आहे.

अमीबिक इंसेफेलायटिस म्हणजे काय?हा आजार नेगलेरिया फाउलेरी नावाच्या सूक्ष्मजीवामुळे होतो. हा सूक्ष्मजीव दूषित गोड्या पाण्यात, जसे की तलाव, नद्या, विहिरी आणि क्लोरीन नसलेल्या पाण्यात आढळतो. जेव्हा एखादी व्यक्ती दूषित पाण्यात पोहते किंवा डुबकी मारते, तेव्हा हा अमीबा नाकावाटे शरीरात प्रवेश करतो. शरीरात शिरल्यानंतर, हा अमीबा थेट मेंदूपर्यंत पोहोचतो आणि मेंदूच्या पेशींवर हल्ला करतो. यामुळे मेंदूच्या पेशी नष्ट होतात आणि संसर्ग झपाट्याने पसरतो, ज्यामुळे मेंदूला गंभीर इजा होते.

जाणून घ्या लक्षणेहा आजार सुरुवातीला सामान्य तापासारखा दिसतो, परंतु काही तासांतच तो गंभीर रुप धारण करतो. त्यात तीव्र डोकेदुखी, ताप, मळमळ आणि उलटी, मान ताठर होणे, वास आणि चवमध्ये बदल, गोंधळ, संतुलन बिघडणे आणि काही प्रकरणांमध्ये कोमामध्ये जाणे यांचा समावेश आहे. लक्षणे सुरू झाल्यानंतर साधारणतः ५ ते १८ दिवसांत मृत्यू होण्याची शक्यता असते.

कोणती काळजी घ्यावी?तज्ज्ञांच्या मते, या संसर्गाचे पसरने अत्यंत वेगाने होते, त्यामुळे तातडीने निदान आणि उपचार न केल्यास रुग्णाला वाचवणे अत्यंत कठीण होते. यामुळे मृत्यूचे प्रमाण खूपच जास्त आहे. हा आजार दुर्मिळ असला तरी तज्ज्ञांनी नागरिकांना स्वच्छतेकडे लक्ष देण्याचा आणि अधिक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

टॅग्स :KeralaकेरळHealth Tipsहेल्थ टिप्स