शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

Corona in Kerala: केरळमध्ये ओणमनंतर कोरोना रुग्णसंख्येत 58 टक्के वाढ; सणासुदीत काळजी घेण्याचे केंद्राचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 10:28 IST

Corona in Kerala: केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह केरळला गेले ते राज्याच्या नेतृत्वाने कटाक्षाने पावले उचलली पाहिजेत हे सांगण्यासाठी. या पार्श्वभूमीवर तेथे ओणमनंतर कोविड पसरला.

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कोरोना महामारी रोखण्यासाठीच्या उपायांचे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या सणासुदीच्या महिन्यांत कठोरपणे पालन करून घेण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकारांना गुरुवारी दिले. कोविड-१९ ची दुसरी लाट अजून विरलेली नाही आणि प्रत्येक सणानंतर कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाल्याचे दिसले आहे, असे केंद्राने म्हटले.देशात कोरोनाच्या रुग्ण संख्येत केरळचा ओणम महोत्सवानंतरचा वाटा हा ५८.४ टक्के आहे. ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत १० हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद होत आहे. एवढेच काय महाराष्ट्रातही रुग्णसंख्या घटली असून तेथे उपचाराधीन रुग्ण १६ टक्के, कर्नाटकमध्ये ५.५८, तमिळनाडूत ५.५ आणि आंध्र प्रदेशमध्ये ४.२१ टक्के आहेत.  देशात गुरुवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ४६,१६४ नोंदली गेली. त्यात केरळचा वाटा मोठा आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह केरळला गेले ते राज्याच्या नेतृत्वाने कटाक्षाने पावले उचलली पाहिजेत हे सांगण्यासाठी. या पार्श्वभूमीवर तेथे ओणमनंतर कोविड पसरला. कोणत्याही परिस्थितीत सणासुदीच्या दिवसांत कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी जास्तीची काळजी घ्या, उपाय योजा, अशा शब्दांत केंद्र सरकारने राज्यांना सावध केले आहे.

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्र सरकारने पुरेशी उपाययोजना केली आहे का, असे विचारल्यावर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, “दुसरी लाट अजून विरलेली नाही. आम्हाला पुढील दोन महिने खूप सावध राहावे लागेल राज्यांनी लसीकरणाचा वेग वाढवावा आणि अपेक्षित लक्ष्य गाठावे.”

बहुसंख्य भारतीयांना लसींनंतर दुष्परिणाम नाहीत : पाहणीचा निष्कर्षn    देशात ६० कोटींपेक्षा जास्त लोकांना कोरोना विषाणूवरील प्रतिबंधक लस दिली गेली असून त्यातील बहुसंख्य जणांना त्यानंतर कोणताही दुष्परिणाम (साईड इफेक्ट) जाणवला नाही किंवा जाणवला असेल तर तो अगदी सौम्य होता. n    यावर्षी १६ जानेवारीपासून देशभर राबविण्यात आलेल्या मोहिमेत कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांच्या अनुभवांची पाहणी करून वरील निष्कर्ष काढण्यात आला आहे. n    सौम्य दुष्परिणाम जाणवले ते कोविशिल्ड लसीची पहिली मात्रा टोचून घेतल्यानंतरच्या २४-४८ तासांत आणि फक्त एक टक्का लोकांना कोविशिल्ड लसीची पहिली मात्रा घेतल्यानंतर कोविड-१९ ची बाधा झाली. या तक्रारी होत्या थकवा, हात दुखणे आणि ताप येण्याच्या. कोव्हॅक्सिन लसीची पहिली मात्रा घेतलेल्यांतील ३० टक्के जणांना ताप आला तर एक टक्के लोकांना तापाशिवाय गंभीर तक्रार होती.

n    ही पाहणी ‘लोकल सर्कल्स’ या कम्युनिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने केली. त्यात कोविशिल्ड लसीची पहिली मात्रा घेतलेल्यांतील ७० टक्के जणांना आणि कोविशिल्डची दुसरीही मात्रा घेतलेल्यांपैकी ७५ टक्के जणांना कोणताही दुष्परिणाम जाणवला नाही किंवा जाणवला असल्यास तो अगदीच सौम्य होता.n    कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा घेतलेल्यांपैकी ६४ टक्के जणांना आणि याच लसीची दुसरी मात्रा घेतलेल्यांपैकी ७८ टक्के जणांना अजिबात दुष्परिणाम जाणवला नाही किंवा जाणवला असल्यास तो अगदीच सौम्य होता.

टॅग्स :Keralaकेरळcorona virusकोरोना वायरस बातम्या