शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

केरळला मुसळधार पावसाचा तडाखा, 9 वर्षांच्या मुलीसह 24 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 17:37 IST

केरळमध्ये सातत्यानं कोसळत असलेल्या पावसानं हाहाकार माजवला आहे.

तिरुवनंतपुरम- केरळमध्ये सातत्यानं कोसळत असलेल्या पावसानं हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अनेक भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. कोझिकोडेमध्ये मुसळधार पावसानं एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. तर दहा जण बेपत्ता आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झालं आहे, ज्यानं मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. तर या मुसळधार पावसानं 24 जणांचा मृत्यू झालाय. कोझिकोडेच्या थेमरेसरीमध्ये भूस्खलनामुळे नऊ वर्षांच्या एका मुलीचा मृत्यू झाला आहे. मृत मुलीचं नाव डेलना आहे. भूस्खलनामुळे त्या मुलीचं घर ढिगा-याखाली दबलं गेलं आहे. इडुक्की, वेनाद आणि कोझिकोडे जिल्ह्यांत भूस्खलन आणि रस्त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आपत्ती प्रशासन विभागानं कोझिकोडेतल्या पूरग्रस्त स्थितीबाबत राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाकडेही मदत मागितली आहे.कन्नूर, कोझिकोडे, कोट्टायम आणि आलपुष्पा जिल्ह्यात बचाव शिबिरं स्थापण्यात आली आहेत. या जिल्ह्यात शेतीला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कोझिकोडेमध्ये 474 लोक बचाव शिबिरात आहे. कोझिकोडेमधलं कक्कयम धरणाचे दरवाजे लवकरच उघडण्यात येणार आहेत. कोट्टयम आलपुष्पा, वायनाड आणि कोझिकोडे जिल्ह्यातील जिल्हाधिका-यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. बुधवारी पठाणमट्टियामध्येही एका 82 वर्षीय आणि एक 20 वर्षीय व्यक्तीचा पुरात बुडून मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे 272 घरांचं प्राथमिक स्वरूपात नुकसान झालं आहे. आपत्कालीन विभागाच्या अधिका-यांनी इडुक्की जिल्ह्यातील डोंगरी भागात रात्री प्रवास करण्यास मनाई केली आहे. तसेच जिल्ह्यातील मुख्य नद्या भारथपुझा आणि पल्लकड जिल्ह्यातील भवानी आणि सिरुवानी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून, इडुक्की आणि मूलपेरियार तलावही पूर्णतः भरले आहेत. इडुक्की धरणातील पाण्याची पातळी 2,324.50 फूट स्तरावर पोहोचली आहे. जी धरणाच्या क्षमतेच्या आर्धी आहे. तसेच इडुक्की भागातल्या तलावही पूर्णतः भरल्यानं अनेक तलावांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. या मुसळधार पावसानं केरळ आणि कर्नाटकाला जोडणारा पूल मुसळधार पावसानं वाहून गेला आहे. कन्नूरमध्ये 100हून झाडं रस्त्यावर कोसळल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी दिली आहे.