शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मजुराला 12 कोटींची लागली लॉटरी अन् झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 12:51 IST

10 फेब्रुवारीला त्यांच्या आयुष्यात असं काही घडलं की त्यांचं जीवनच बदलून गेलं.

कन्नूर- केरळमधल्या कन्नूरमध्ये वास्तव्याला असलेल्या पेरुन्नन राजन हे मजुरीचं काम करतात. 10 फेब्रुवारीला त्यांच्या आयुष्यात असं काही घडलं की त्यांचं जीवनच बदलून गेलं. मजुरी करणाऱ्या राजन यांना लाखोंची नव्हे, तर 12 कोटींची लॉटरी लागली. टॅक्स कापून त्यांच्या खात्यात जवळपास 7 कोटी रुपये आले आहेत. मी रातोरात करोडपती झालो हे स्वप्नच वाटत असल्याचंही भावनाही राजन यांनी व्यक्त केली. मलूरच्या थोलांबरा भागात राहणाऱ्या 58 वर्षीय राजन मजुरीचं काम करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. परिस्थिती बेताची असली तरी ते लॉटरीचं तिकीट घेण्यास विसरत नाहीत. त्यांना विश्वास होता की, कधी तरी त्यांचं नशीब फळफळेल. बऱ्याचदा क्रॉस चेक केला निकाललॉटरी लागल्यानंतर राजन म्हणाले, मला एवढे मोठे यश मिळेल असं वाटलं नव्हतं. जेव्हा लॉटरीचे निकाल जाहीर करण्यात आले, तेव्हा मी जिंकेन असं वाटलं नव्हतं. कुटुंबीयांबरोबर लॉटरीचा निकाल पाहिला आणि माझ्या आनंदाला पारावरच उरला नाही. लॉटरीचं तिकीट बँकेत जमा करण्यापूर्वी अनेकदा ते क्रॉस-चेक केल्याचंही राजन यांनी सांगितलं. गरजवंतांसाठी काही तरी करणारथोलांबराच्या को-ऑपरेटिव्ह बँकेशी संपर्क साधला आहे. तिथल्या अधिकाऱ्यांनी कन्नूरच्या जिल्हा बँकेत जाण्यास सांगितलं, असंही राजन सांगतात. त्यानंतर ते पत्नी रजनी, मुलगा रिगील आणि मुलगी अक्षराबरोबर बँकेत पोहोचले आणि तिथे तिकीट सबमिट केलं. लॉटरीचे पैसे काय करणार यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, सर्वात आधी घेतलेल्या उधाऱ्या फेडून टाकणार आहे. त्यानंतर ते गरजवंतांसाठी काही तरी करणार आहेत. मला कष्टाच्या कमाईची किंमत माहीत आहे. अशातच ही रक्कम वाया जाऊ देणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.