शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मशीद परिसरात झाला हिंदू मुलीचा विवाह; CM पिनराई विजयन यांनी शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 10:58 IST

केरळमधल्या अलापुझ्झामध्ये एका मुस्लिम समाजानं मशीद परिसरात एका हिंदू मुलीचं लग्न लावून समाजापुढे एक अनोखं उदाहरण ठेवलं आहे.

ठळक मुद्देमुस्लिम समाजानं मशीद परिसरात एका हिंदू मुलीचं लग्न लावून समाजापुढे एक अनोखं उदाहरण ठेवलं आहे.अलापुझ्झामधल्या चेरुवल्ली स्थित जुमा मशीद परिसरात पारंपरिक हिंदू पद्धतीनुसार हे लग्न करण्यात आलं. मशीद कमिटीनं लग्न संपन्न झाल्यानंतर जेवणाचंही आयोजन केलं होतं.

अलापुझ्झाः केरळमधल्या अलापुझ्झामध्ये एका मुस्लिम समाजानं मशीद परिसरात एका हिंदू मुलीचं लग्न लावून समाजापुढे एक अनोखं उदाहरण ठेवलं आहे. अलापुझ्झामधल्या चेरुवल्ली स्थित जुमा मशीद परिसरात पारंपरिक हिंदू पद्धतीनुसार हे लग्न करण्यात आलं. मशीद कमिटीनं लग्न संपन्न झाल्यानंतर जेवणाचंही आयोजन केलं होतं. ज्यात हिंदू-मुस्लिम दोन्ही समुदायातील लोक सहभागी होते. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीसुद्धा मुस्लिम समाजाच्या या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक केलं आहे.  काय आहे प्रकरण?अंजू  (22)च्या वडिलांचं दोन वर्षांपूर्वीच एका अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या आईला मुलीच्या लग्नाची चिंता सतावत होती. घरातील परिस्थिती ठीक नसल्याच्या कारणास्तव लग्नाच्या खर्चाची व्यवस्था होऊ शकली नाही. अशातच आईनं मुलीचं लग्न करण्यासाठी स्थानिक मशीद प्रशासनाकडे आर्थिक मदत मागितली. मशीद प्रशासनानं पूर्ण मदत करण्याचा विश्वास दिला. अंजूचं लग्न 19 जानेवारीला शरदबरोबर ठरलं होतं. पारंपरिक रितीरिवाजात झालं लग्नरविवारी मशीद परिसरात फुलांची सजावट करण्यात आली होती. मशीद परिसरात मंडप बनवण्यात आलं असून, आतमध्ये बैठकीची व्यवस्था केली होती. पूर्णतः हिंदू परंपरेनं अंजू आणि शरद यांचं लग्न लावून देण्यात आलं. लग्नानंतर आलेल्या पाहुण्या मंडळींसाठी मशीद परिसरात जेवणाची सोय करण्यात आली. सर्वच लोकांना शाकाहारी जेवण वाढण्यात आलं. या लग्न समारंभात दोन्ही वधू-वर या बाजूंकडून जवळपास 1 हजार लोक सहभागी झाले. या मशीद कमिटीनं वधूला सोन्याचे 10 दागिने आणि 2 लाख रुपयांचं उपहार दिलं.सीएम पिनराई विजयन यांनी केलं कौतुककेरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मुस्लिम समाजाच्या या उपक्रमाचं कौतुक केलं आहे. सीएमनं नव्या जोडप्याला फेसबुकवरून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी मुस्लिम समुदायाचीही प्रशंसा केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालं लग्नाचं कार्डअंजू आणि शरदच्या लग्नाचं कार्ड सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. अंजूच्या कुटुंबीयांच्या आग्रहाखातर आम्ही लग्नाचं आयोजन करत आहोत. सर्वच जण या लग्नात सहभागी होण्यासाठी आमंत्रित आहेत. आता सोशल मीडिया युजर्सनं या नव्या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मुस्लिम समुदायाकडूनही कौतुक करत आहेत.