शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Kerala Floods : केरळच्या पावसात उद्ध्वस्त झाला दुर्मीळ ठेवा, कोट्यवधीचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 14:58 IST

मुसळधार पावसानंतर केरळमध्ये आलेला पूर आता हळुहळू ओसरू लागला आहे. मात्र पाणी ओसरू लागल्यानंतर या पुरामुळे झालेल्या नुकसानीचे विदारक चित्र समोर येऊ लागले आहे.

कोची -  मुसळधार पावसानंतर केरळमध्ये आलेला पूर आता हळुहळू ओसरू लागला आहे. मात्र पाणी ओसरू लागल्यानंतर या पुरामुळे झालेल्या नुकसानीचे विदारक चित्र समोर येऊ लागले आहे. केरळमधील अरनमुला जिल्ह्यातील दुर्मीळ ठेव्याचेही या पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अरनमुला जिल्हा विशेष प्रकारचे आसरे तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच या आरशांना युनेस्कोचे जीआय मानांकन मिळालेले आहे. हे मानांकन अशा वस्तूंनाच मिळते ज्या वस्तुंची निर्मिती करण्याचा अधिकार त्या प्रदेशाकडे असतो.  अरनमुलामधील हे आरसे ही केरळच्या सर्वात जुन्या कलात्मक वारशांपैकी एक कला आहे. हे आरसे कथील आणि तांब्याच्या मिश्रणापासून बनवले जातात. ही कला अरनमुला जिल्ह्यातील केवळ 22 कुटुंबांनाच अवगत आहे. अरनमुला कन्नडी नावाने प्रसिद्ध असलेले हे आरसे केरळची अधिकृत भेटवस्तू म्हणून ओळखले जातात. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा, प्रिन्स चार्ल्स, भारताचे राष्ट्रपती तसेच पंतप्रधानांनाही हे आरसे भेट म्हणून देण्यात आलेले आहेत. 

वर्तवण्यात येत असलेल्या अंदाजानुसार या महापुरामध्ये शिल्पकारांना सुमारे सहा हजार आरसे गमावले आहेत. या आरशांची किंत सुमारे दीड कोटी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हे आरसे बनवणाऱ्या कलाकारांपैकी एक असलेल्या पी. गोपालकुमार यांनी पुराची भीषणता वर्णन करताना सांगितले की, पुराचे पाणी माझ्या वर्कशॉपमध्ये घुसत होते. मी एका आरशाला पकडले तर दुसरा हातातून निसटत होता. पाणी गळ्यापर्यंत पोहोचले होते. तोपर्यंत अनेक आरसे वाहून गेले होते. 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळartकलाnewsबातम्या