शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

Kerala Floods : केरळमधील पुरग्रस्तांना मोदी सरकारने पुरेशी मदत केली नाही , राहुल गांधींचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 11:20 IST

मुसळधार पाऊस आणि पुरस्थितीमुळे केरळमध्ये अतोनात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमधून सावरण्यासाठी केरळला मोठ्या प्रमाणात मदतीची गरज आहे. मात्र...

कोच्ची - मुसळधार पाऊस आणि पुरस्थितीमुळे केरळमध्ये अतोनात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमधून सावरण्यासाठी केरळला मोठ्या प्रमाणात मदतीची गरज आहे. मात्र केंद्रातील मोदी सरकारने केरळमधील पुरग्रस्तांना पुरेशी मदत केली नाही, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी मंगळवारी केरळमधील पुरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी केरळमधील पुराबाबत केंद्राने घेतलेल्या भूमिकेवर टीका केली. "केंद्र सरकारने केरळमधील पुरग्रस्तांना पुरेशी मदत करणे आवश्यक होते. हे केरळच्या लोकांचे ऋण आहे. हा त्यांचा हक्क आहे. मात्र केंद्र सरकारने जेवढी करणे आवश्यक असते तेवढी मदत केली नाही, याचे मला दु:ख आहे,"असे राहुल गांधी म्हणाले. तसेच मी येथे केरळच्या जनतेच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आलो आहे. राजकारण करण्यासाठी नाही, असेही त्यांनी सांगितले. मी काल केरळमधील अनेक मदत केंद्रांना भेट दिली. तेथे राहत असलेले लोक पुनर्वसनाबाबत चिंतीत आहेत. मी केरळण्याच मुख्यमंत्र्यांशीसुद्धा चर्चा केली. या घडीला पुरात नुकसान झालेल्या घरांचे पुन्हा बांधकाम करण्यासाठी मदत केली जाईल, असे आश्वासन सरकारने देणे आवश्यक आहे. तसेच नुकसान भरपाई देण्याच्या आश्वासनाची पूर्तताही लवकरात लवकर होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी भाजपावरही जोरदार टीका केली. "भारतात दोन व्हिजन आहेत. एक केंद्रीकृत व्हिजन आणि दुसरा विकेंद्रित व्हिजन. यापैकी केंद्रीकृत व्हिजनमध्ये केवळ एका विचारसरणीचा सन्मान केला जातो. तर दुसऱ्या व्हिजनमध्ये सर्व विचार, संस्कृती आणि देशातील विविध लोकांचा सन्मान केला जातो."असे ते म्हणाले.  

 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरRahul Gandhiराहुल गांधीGovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदी