शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ, केरळ कोर्टाचे अजामीनपात्र वॉरंट; नेमके प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 10:27 IST

Baba Ramdev: पतंजलि उत्पादनांवरून बाबा रामदेव यांच्याविरोधात खटले दाखल करण्यात आले असून, त्यावर सुनावणी सुरू आहे.

Baba Ramdev: गेल्या काही दिवसांपासून योगगुरू बाबा रामदेव यांच्या अडचणी वाढताना पाहायला मिळत आहेत. देशातील काही न्यायालयांमध्ये पतंजलिच्या उत्पादनांसंदर्भात खटले दाखल करण्यात आले आहेत. यातच केरळमधील एका न्यायालयाने बाबा रामदेव आणि पतंजलि योगपीठाचे अध्यक्ष आचार्य बालकृष्ण यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पलक्कड जिल्हा न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणीवेळी बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण गैरहजर राहिल्यामुळे हे अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. केरळच्या ड्रग्ज इन्स्पेक्टरने दिव्या फार्मसीविरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी खटल्याच्या सुनावणीला हे दोघेही उपस्थित राहू शकले नाहीत. न्यायालयाने दोघांविरुद्ध १५ फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. यापूर्वी १ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले होते, जेणेकरून ते न्यायालयात हजर राहू शकतील. हे प्रकरण दिव्या फार्मसीने प्रकाशित केलेल्या कथित दिशाभूल करणाऱ्या वैद्यकीय जाहिरातींशी संबंधित आहे. यावर केरळ ड्रग्ज इन्स्पेक्टरने कारवाई केली. तत्पूर्वी, पतंजलि कापूर उत्पादनांच्या विक्रीवर बंदी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पतंजलिला ४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने बाबा रामदेव यांच्यावर कोरोना बरा करण्याचा दावा केल्याचा आणि आधुनिक औषधांना निरुपयोगी म्हणल्याचा आरोप केला होता.

दरम्यान, योगगुरू बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड यांच्याविरुद्ध अनेक खटले दाखल आहेत. यामध्ये दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, ट्रेडमार्क उल्लंघन यासारख्या प्रकरणांचा समावेश आहे. या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि पतंजलीला दिलासा दिला असला तरी, पुन्हा न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केले तर शिक्षा होऊ शकते, अशी ताकीद न्यायालयाने दिली होती.

 

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाCourtन्यायालय