शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

"वायनाड दुर्घटनेनंतर काही तासांनी मिळाला अलर्ट", अमित शाहांच्या दाव्यावर केरळच्या मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 20:04 IST

Wayanad landslides : मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले, या भागासाठी कोणताही रेड अलर्ट नाही. मात्र, या घटनेनंतर काही तासांनी अलर्ट जारी करण्यात आला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)यांच्या दाव्यावर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (Pinarayi Vijayan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  वायनाड भूस्खलनाच्या (Wayanad landslides) घटनेपूर्वी कोणताही रेड अलर्ट जारी करण्यात आला नव्हता, असं मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले. तसंच, आरोप-प्रत्यारोपांची ही वेळ नसल्याचेही ते म्हणाले. 

वृत्तानुसार, मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले, या भागासाठी कोणताही रेड अलर्ट नाही. मात्र, या घटनेनंतर काही तासांनी अलर्ट जारी करण्यात आला. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत सांगितलं की, आपत्तीचा अंदाज लक्षात घेऊन केरळ सरकारला आधीच अलर्ट जारी करण्यात आला होता. तसंच, आपत्तीपूर्वी जारी करण्यात आलेल्या इशाऱ्यांकडे बहुतांश राज्ये लक्ष देतात, मात्र, केरळ सरकारनं आपत्तीबाबत जारी केलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं, असं अमित शाह यांनी सांगितलं.

दरम्यान, मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले, वायनाडमध्ये बचावकार्य सुरू आहे. ही एक वेदनादायक आपत्ती आहे. आतापर्यंत १४४ मृतदेह बाहेर काढण्यात आले. यामध्ये ७९ पुरुष आणि ६४ महिला आहेत. तसंच, १९१ लोक अजूनही बेपत्ता आहेत. आपत्तीग्रस्त भागातून जास्तीत जास्त लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय, जखमींना आवश्यक वैद्यकीय उपचार दिले जात आहेत, असं पिनाराई विजयन यांनी सांगितलं.

काय म्हणाले अमित शाह?सभागृहात बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी सुरुवातीला भूस्खलनामुळे प्राण गमावलेल्या कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला. तसंच, या आपत्तीबाबत काही माहिती सभागृहात सांगितली. अमित शाह म्हणाले की, "२३ तारखेलाच एनडीआरएफच्या ९ टीम केरळला पाठवल्या होत्या. केरळ सरकारला केंद्र सरकारनं २३ जुलै रोजीच पूर्व इशारा दिला होता. केरळ सरकारला २३, २४ आणि २५ जुलै रोजीही पूर्वसूचना देण्यात आली होती. २६ जुलैला २० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडेल, भूस्खलन होऊ शकते, चिखलही येऊ शकतो आणि काही लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असं आम्ही आधीच सांगितलं होतं. केरळ सरकारनं काय केलं? लोकांचं स्थलांतर केलं नाही. स्थलांतर केलं असतं, तर इतक्या लोकांचा जीव गेला नसता."

वायनाड भूस्खलनावर राहुल गांधी काय म्हणाले?"वायनाडमध्ये घडलेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. जवान चांगलं काम करत आहेत. अशा कठीण प्रसंगी वायनाडच्या लोकांच्या पाठिशी उभं राहणं गरजेचं आहे. मी सरकारला तात्काळ मदतीची विनंती करतो. वायनाडमध्ये दुसऱ्यांदा अशी दुर्घटना घडली आहे. ५ वर्षांपूर्वीही अशीच घटना घडली होती. या भागात पर्यावरणीय समस्या आहे, म्हणून याकडं लक्ष दिलं पाहिजं आणि जे काही हाय-टेक उपाय केले जाऊ शकतात, ते करण्यात यावे", अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहlandslidesभूस्खलनKeralaकेरळ