शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

केरळमधील मुलाचा ब्लू व्हेल चॅलेंजमुळे बळी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 14:35 IST

केरळमधील तिरुअनंतपुरममध्ये एका 16 वर्षीय मुलाने ब्लू व्हेल गेम चॅलेंजच्या नादात आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे.

तिरुअनंतपुरम, दि. 16 - जीवघेणा ऑनलाइन गेम 'ब्लू व्हेल चॅलेंज'च्या जाळ्यामुळे लहान मुलांचे शिकार होण्याचे प्रमाण वाढत चालल्याचे निदर्शनास येत आहे.  केरळमधील तिरुअनंतपुरममध्ये एका 16 वर्षीय मुलाने ब्लू व्हेल गेम चॅलेंजच्या नादात आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. 26 जुलै रोजी तिरुअनंतपुरममधील विलापिलसलाजवळ  एका शाळकरी मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे. आत्महत्या केलेल्या मुलाच्या आईचे असे म्हणणे आहे की, ब्लू व्हेल गेमच्या नादात त्यांच्या मुलाने आत्महत्या केली.  मुलाच्या आईनं एका टीव्ही चॅनेलला सांगितले की, त्यांच्या मुलाने नोव्हेंबर 2016 मध्ये ब्लू व्हेल गेम डाउनलोड केला होता. पुढे त्यांनी असेही सांगितले की, त्यांनी आपल्या मुलाला हा जीवघेणा ब्लू व्हेल गेम खेळू नकोस, असे अनेकदा बजावलेदेखील होते.  धक्कादायक म्हणजे त्यांच्या मुलाने यापूर्वीही दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ज्यामुळे तो गंभीर जखमीदेखील झाला होता. एकदा त्यानं कर्कटकच्या सहाय्याने स्वतःला जखमीदेखील करुन घेतले होते. दुस-या वेळेस त्यानं नदीत उडी मारली होती. सुदैवानं दोन्ही वेळेस तो वाचला होता, असे त्यांच्या आईनं सांगितले. दरम्यान, आत्महत्या केलेल्या मुलाच्या आईनं दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.    

दरम्यान, जगभरात धुमाकूळ घालणा-या जीवघेण्या ब्ल्यू व्हेल चॅलेंज गेमबाबतच्या सर्व लिंक तातडीने काढून टाकण्याचे आदेश केंद्र सरकारने सर्व सोशल मीडिया साइट्सना दिले आहेत. इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून या गेमची किंवा त्यासंबंधित असलेली लिंक तातडीने हटवावी, असे पत्र इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गुगल, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि याहू यासारख्या वेबसाइट्सना पाठविले आहे.

ब्ल्यू व्हेल चॅलेंजमुळे भारतात अनेक ठिकाणी मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबई आणि पश्चिम बंगालमध्येही अशा घटना काही दिवसांपूर्वी घडल्या होत्या. त्यामुळे या गेमवर बंदी घालण्याची मागणी सर्व स्तरातून जोर धरत होती. २०१३ साली रशियात फिलिप ब्यूडेइकिन व त्याच्या साथीदारांनी ब्ल्यू व्हेल चॅलेंज डेव्हलप केले. ब्ल्यू व्हेल म्हणजे एक वेगवेगळे टास्क देणारा अ‍ॅडमिनिस्ट्रेटर आहे. आॅर्डर देणारी व्यक्ती अज्ञात असते. एकदा या खेळात लॉग इन केले की तो वेगवेगळे चॅलेंज देतो. साधारणत: ५0 टप्पे ओलांडावे लागतात. या टप्प्याची प्रगती सोप्यापासून अवघड लेव्हलच्या दिशेने होते. शेवटी खेळणा-याला आत्महत्या करण्याचे आव्हान दिले जाते.

पालकांनो हे कराच...मुले कोणता गेम खेळतात,याकडे लक्ष द्या.त्यांच्याशी संवाद साधा, समजून घ्या.मुला-मुलींना ओरडण्यापेक्षा त्यांच्यासोबत वेळ घालवा.मित्र-मैत्रिणींच्या दबावाखाली कोणतीही गोष्ट करण्यापासून रोखा.चांगले आणि वाईट काय, हेत्यांच्या भाषेत सांगा.

ब्ल्यू व्हेल चॅलेंज टास्क : हातावर ब्लेडने ब्ल्यू व्हेलचे चित्र रेखाटणे, हाताच्या नसा कापणे, ओठांवर ब्लेडने कापणे, पहाटे एखाद्या उंच ठिकाणी जाणे, पहाटे उठून हातावर वार करणे, हॉरर चित्रपट पाहणे, गच्चीवरून उडी मारणे

या हॅशटॅग्सपासून सावध राहा‘दी ब्ल्यू व्हेल चॅलेंज’पासून वाचण्यासाठी #curatorfindme #iamawhale #thebluewhale #wakemeupat420  या हॅशटॅग्सपासून लांबच राहा.