शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

केरळ विधानसभेचा ठराव घटनाबाह्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 02:35 IST

नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा हा केंद्राच्या अखत्यारितला विषय- राज्यपाल अरीफ मोहम्मद खान

तिरुवनंतपुरम : नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्दबातल करावा, अशी केंद्राकडे मागणी करणारा केरळ विधानसभेने मंजूर केलेला प्रस्ताव घटनाबाह्य आहे, असे त्या राज्याचे राज्यपाल अरीफ मोहम्मद खान यांनी गुरुवारी म्हटले. खान म्हणाले की, नागरिकत्वाचा विषय केंद्राच्या अखत्यारितला असून त्याच्याशी राज्यांचा काहीही संबंध नाही. त्यामुळे केरळ विधानसभेने मंगळवारी मंजूर केलेला प्रस्ताव घटनात्मकदृष्ट्या अवैध आहे.आपला संबंध नाही अशा विषयांमध्ये केरळमधील सत्ताधारी नाक का खुपसत आहेत? देशाच्या फाळणीची झळ केरळला कधीही लागली नाही. या राज्यामध्ये घुसखोरांची समस्या नाही, असेही अरीफ मोहम्मद खान म्हणाले. सीएएची अंमलबजावणी करण्यासंदर्भात केंद्राला अजिबात सहकार्य करू नये यासह अन्य काही मागण्या इंडियन हिस्ट्री काँग्रेसने केरळ सरकारकडे केल्या होत्या. या संस्थेचे कन्नूर येथे नुकतेच अधिवेशन भरले होते. या कायद्याबाबत राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यांविरोधात सदर अधिवेशनात निदर्शने करण्यात आली. यासंदर्भात राज्यपाल मोहम्मद अरीफ खान यांनी सांगितले की, इंडियन हिस्ट्री काँग्रेसने केलेल्या मागण्या बेकायदेशीर आहेत. सीएए रद्दबातल करण्याची मागणी करणारा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करणारे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.डावी आघाडी व काँग्रेस एकत्रनागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी करणार नसल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याआधीच जाहीर केले आहे. या कायद्याविरोधात केरळमध्ये लढा उभारण्यासाठी डावी आघाडी व काँग्रेस एकत्र आले आहेत.नागरिकत्वासंदर्भात कोणताही कायदा करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. त्या विषयाचा राज्य विधिमंडळांशी काहीही संबंध नाही. त्यामुळे केरळ विधानसभेने मंजूर केलेला प्रस्ताव अवैध आहे, असे केंद्रीय विधि खात्याचे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.मात्र, ही टीका फेटाळताना केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले की, राज्य विधानसभांना स्वत:चे काही अधिकार असतात.नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात केरळ विधानसभेने कोणताही कायदा नव्हे तर फक्त प्रस्ताव मंजूर केला आहे. ही वस्तुस्थिती प्रस्तावावर टीका करणाऱ्यांनी लक्षात घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक