शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

महाप्रलयावर मात करत पर्यटनासाठी केरळ सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 23:03 IST

नीलाकुरूंजी पर्यटकांच्या प्रतीक्षेत; केरळ पर्यटन विभागाची माहिती

मुंबई : महाप्रलयानंतर उद्ध्वस्त झालेले केरळ पुन्हा एकदा उभे राहिल्याची माहिती केरळपर्यटन विभागाने शनिवारी दिली आहे. केरळ प्रशासनाने तातडीने यासंदर्भात दुरुस्तीची कामे हाती घेत रस्ते, पाणी, वीज या समस्या सोडविल्या असून, पर्यटकांसाठी केरळ सज्ज असल्याचा दावाही केरळ पर्यटन विभागाने केला आहे. वरळीतील नेहरू सेंटरमध्ये आयोजित मेळाव्यात पर्यटन विभागाकडून पर्यटकांमध्ये सद्य:स्थितीबाबत जनजागृती केली जात आहे. पर्यटकांना या मेळाव्यात मोफत प्रवेश दिला जाणार असून रविवारी, ७ ऑक्टोबरला मेळाव्याचा शेवटचा दिवस आहे.महाप्रलयामुळे रस्त्यांसह वीज आणि पाण्याची मोठी समस्या केरळमध्ये निर्माण झाली होती. मात्र प्रशासनाने तातडीची पावले उचलत या समस्येवर मात केली आहे. त्यामुळे येथील पर्यटनस्थळापर्यंत पोहोचण्यास कोणतीही अडचण उरलेली नाही. येथील जनजीवन सुरळीत झाले असून पर्यटकांनी मोठ्या संख्येने केरळला भेट देण्याचे आवाहन पर्यटन विभागाने केले आहे. केरळमधील आकर्षणांबाबत माहिती देण्यासाठी केरळ पर्यटन विभागातर्फे या मेळाव्यात सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे.केरळसोबत राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश येथील राज्य शासनाच्या पर्यटन विभागांनीही आपापल्या पर्यटनस्थळांची माहिती देण्यासाठी मेळाव्यात भाग घेतला आहे. केरळसह देशांतर्गत पर्यटन व्यवसाय वाढीसाठी या मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती आयोजकांनी दिली.नीलाकुरूंजी उत्सवाचे आयोजनतब्बल १२ वर्षांतून एकदाच फुलणाºया ‘नीलाकुरींजी’ यांचा हंगाम ऑगस्टमध्ये सुरू झाला आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत ही फुले पूर्णपणे फुलतात. त्यामुळे ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यापासून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या फुलांना पाहण्यासाठी रोज सरासरी ४ ते ५ हजार पर्यटक या ठिकाणी भेट देतात. या ऐतिहासिक उत्सवासाठी वन विभागाकडून दर १२ वर्षांतून एकदा विशेष परवानगी दिली जाते. याआधी हा उत्सव २००६ साली झाला होता. 

टॅग्स :KeralaकेरळKerala Floodsकेरळ पूरtourismपर्यटन