शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

एक रिसेप्शन अन् वाढलं टेन्शन; वधू-वरासह तब्बल ४३ जणांना कोरोना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 19:22 IST

लग्नासाठी ५० जणांची मर्यादा असताना सव्वाशेहून अधिक जणांची उपस्थिती

थिरुअनंतपुरम: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी समारंभ साजरे करताना नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र तरीही नियम धाब्यावर बसवून सोहळ्यांचं आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वेगानं होत असून रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. केरळच्या थिरुअनंतरपुरममधील एका विवाह सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या तब्बल ४३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये नवदाम्पत्याचाही समावेश आहे.लग्न सोहळ्यांसाठी ५० जणांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र थिरुअनंतपुरममध्ये १७ जुलैला संपन्न झालेल्या लग्नाला सव्वाशेहून अधिक जण उपस्थित होते. केरळच्या कासरगोड जिल्ह्यातल्या चेंगला पंचायतीमध्ये विवाह सोहळा संपन्न झाला. या लग्नाला उपस्थित असलेल्या ४३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये वर आणि वधूचाही समावेश आहे. लग्नाला उपस्थित असलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर ही बाब समोर आली.या प्रकरणी बडीयुडुक्का पोलिसांनी वधूच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी त्यांना १०  हजारांचा दंड आणि दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागू शकते. सर्वप्रथम वधूच्या वडिलांचाच कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे वधूचे वडील त्यांच्या जावयासोबतच काही महिन्यांपूर्वी दुबईहून आले होते.लग्नाला उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोनाची बाध झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर इतरांना होम क्वारंटिन करण्यात आलं आहे. यानंतर कासरागोड, मंजेश्वरम, होसदुर्ग, कुंबाला आणि निलेश्वरम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्बंध वाढवण्यात आले असून परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थादेखील थांबवण्यात आली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या