शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

CM अरविंद केजरीवालांचे आणखी एक पत्र पत्नीने वाचले, पण 'त्या' फोटोने लक्ष वेधले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 14:41 IST

शहीद भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत अरविंद केजरीवालांचा फोटो लावण्यात आला आहे.

Arvind Kejriwal: दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) सध्या तिहार तुरुंगात कैद आहेत. मात्र तुरुंगातूनच ते पत्नी सुनीता केजरीवाल यांच्या माध्यमातून जनतेला आणि आम आदमी पक्षाच्या आमदारांना आपले संदेश पाठवत आहेत. आज म्हणजेच 4 एप्रिल रोजी सुनीता केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अरविंद यांनी दिलेला संदेश शेअर केला.

अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेतली, पण त्यांच्या पाठीमागे असलेल्या दृष्याने सर्वांनाच चकीत केले. सुनीता यांच्या पाठीमागे भिंतीवर नेहमीप्रमाणे शहीद भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता. पण, त्यांच्या फोटोसोबतच अरविंद केजरीवाल यांचाही फोटो लावण्यात आला . या फोटोद्वारे आप कोणता संदेश देऊ इच्छि आहे, हे त्यांनाच माहित. 

दिल्लीकरांना कोणतीही अडचण येऊ नयेदरम्यान, केजरीवालांनी आपल्या संदेशात म्हटले की, मी तुरुंगात आहे, पण माझ्या एकाही दिल्लीकराला अडचण येता कामा नये. प्रत्येक आमदाराने दररोज त्या त्या भागात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घ्याव्या. कोणालाही काही समस्या असेल, तर तात्काळ सोडवाव्यात. दिल्लीतील 2 कोटी जनता माझे कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबातील कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले.

15 एप्रिलपर्यंत तुरुंगात राहणार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 2 तासांच्या चौकशीनंतर 21 मार्च रोजी ईडीने त्यांच्या घरातून अटक केली होती. दरम्यान, दिल्ली सरकारने नोव्हेंबर 2021 मध्ये मद्य धोरण आणले, त्यानंतर लगेचच 2022 मध्ये त्यात अनियमितता आढळून आली. माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आणि सप्टेंबर 2022 पासून या प्रकरणाशी संबंधित लोकांना अटक करण्यात आली. या प्रकरणी आतापर्यंत एकूण 16 जणांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार, अरविंद केजरीवाल 15एप्रिलपर्यंत तुरुंगात राहणार आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या तीन मित्रांना त्यांना तुरुंगात भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCourtन्यायालय