नवी दिल्ली- आम आदमी पार्टी आणि सरकारी कार्यक्रमांपासून वारंवार दूर ठेवण्यात आलेल्या आमदार अलका लांबा यांनी केजरीवालांवर आरोप केले आहेत. पार्टीतील माझी भूमिका स्पष्ट करा. पार्टीचे सर्वोच्च नेते माझ्यावर नाराज का आहेत. कमीत कमी ते कारण तरी स्पष्ट करा. मला निवडणुकीतल्या तिकिटासाठी लाचार नाही. मी माझ्या क्षेत्रात काम केलं आहे.पक्षाच्या बैठकीला मला बोलवण्यात येत नाही, त्यामुळे मी दुःखी आहे. ट्विटरवरून अरविंद केजरीवाल यांनी मला अनफॉलो केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या व्यवहारावर अलका नाराज आहे. आम आदमी पार्टीनं कमीत कमी माझी पक्षातील भूमिका तरी स्पष्ट करावी. माझ्या चांदणी चौक भागात आप कार्यकर्ते आणि सामान्यांचं खच्चीकरण होत आहे. पक्षाचं तुमच्याबद्दलचं मत अचानक का बदलले. पार्टीतले नेते माझ्यावर नाराज आहे.परंतु माझ्यावर नाराजी का आहे, ते तरी केजरीवालांनी सार्वजनिक करावं. जेणेकरून कोणताही संभ्रम राहणार नाही. मी गेल्या 25 वर्षांपासून राजकारणात आहे. त्यामुळे मला तिकिटाचा मोह नाही. मी आम आदमी पार्टीशी एकनिष्ठ आहे. चांदणी चौकातल्या मतदारसंघात मी भरपूर काम केलं आहे. त्यामुळे माझ्यावर कोणीही आरोप करू शकत नाही.
अलका लांबांना केजरीवालांनी ट्विटरवर केलं अनफॉलो, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 12:43 IST