शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

राष्ट्रीय राजकारणात केजरीवाल बळकट; प्रमुख प्रादेशिक नेत्यांना जे जमले नाही ते करून दाखविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 06:07 IST

गेल्या ७ वर्षांपासून अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. दिल्लीतील विधानसभेच्या सलग तीन निवडणुकांमध्ये यश प्राप्त केले.

सुरेश भुसारी  लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिल्लीसह पंजाबमध्येही ऐतिहासिक विजय संपादन करून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय राजकारणातील आपले स्थान अधिक बळकट केले आहे. मोदी सरकारच्या विरोधातील एक नवा चेहरा राष्ट्रीय राजकारणात आता अधिक दमदारपणे पाऊल टाकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या ७ वर्षांपासून अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. दिल्लीतील विधानसभेच्या सलग तीन निवडणुकांमध्ये यश प्राप्त केले. त्यांची मनीषा नेहमीच राष्ट्रीय राजकारण करण्याची असल्याचे लपून राहिले नाही. यासाठी त्यांनी २०१४ मध्ये थेट नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीमधून आव्हान दिले होते. परंतु, तेव्हा त्यांची ही चाल अंगलट आली. त्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वक्तव्य देणे बंद करून इतर राज्यांमध्ये आपचे जाळे वाढविण्यास सुरुवात केली. त्यांचे पहिले लक्ष्य पंजाबमध्ये होते. 

पंजाबमध्ये ४ खासदार निवडून आले होते. २०१७ च्या निवडणुकीत त्यांनी पंजाबमध्ये काँग्रेसला जोरदार लढत दिली. तेव्हा केजरीवाल पंजाबचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेने आपचा घोडा अडला. आता मात्र पंजाबमध्ये आधीच शीख मुख्यमंत्र्यांचा चेहरा जाहीर करून आपल्यावरील आक्षेप फेटाळूनलावले. 

प्रादेशिक नेत्यांना मागे टाकलेn    दोन राज्यांमध्ये सत्ता स्थापन करून केजरीवाल यांनी देशातील प्रादेशिक इतर नेत्यांपुढे मोठी मजल मारली आहे.n    पुढील लक्ष्य लोकसभा असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. पंजाबमधील आपच्या या ऐतिहासिक यशाने केजरीवाल यांचे राष्ट्रीय राजकारणातील स्थान अधिक दृढ झाले आहे.

शब्दांना येणार धारn    ममता बॅनर्जी, शरद पवार, के. चंद्रशेखर राव, जगन रेड्डी, एम. के. स्टालिन, नवीन पटनायक या प्रमुख प्रादेशिक नेत्यांना जे जमले नाही ते केजरीवाल यांनी करून दाखविले आहे. n    यामुळे केजरीवाल यांचे राष्ट्रीय राजकारणातील शब्दांना भविष्यात अधिक धार येणार आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालPunjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२