शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
3
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
4
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
5
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
6
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
7
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
8
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
9
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
10
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
11
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
12
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
13
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
14
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
15
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
16
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
17
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
18
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
19
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
20
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती

'आप'च्या योगेंद्र यादव यांचा राजीनामा,केजरीवाल यांनी फेटाळला

By admin | Updated: May 31, 2014 19:42 IST

लोकसभा निवडणुकीत हरियाणा येथे 'आम आदमी पक्षा'च्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत योगेंद्र यादव यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. मात्र अरविंद केजरीवाल यांनी हा राजीनामा फेटाळून लावला आहे.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली,दि. ३१ -  लोकसभा निवडणुकीत हरियाणा येथे 'आम आदमी पक्षा'च्या खराब कामगिरीची नैतिक जबाबदारी स्वीकारत 'आप'चे नेता योगेंद्र यादव यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. मात्र 'आप'चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा राजीनामा फेटाळून लावला आहे. दरम्यान 'आप'चे हरियाणा युनिटचे अध्यक्ष नवीन जयहिंद यांनीही सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. आपण राष्ट्रीय कार्यकारिणीचा राजीनामा दिला असला तरी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपण काम करत राहू असे जयहिंद यांनी सांगितले. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा येथे पक्षाला पत्कराव्या लागलेल्या पराभवानंतर योगेंद्र यादव व जयहिंद यांच्यात वाद सुरू झाले होते. पराभवाची जबाबदारी दोघेही एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न करत होते. यादव हे गुरगाव येथून निवडणूक लढवली तर जयहिंद रोहतक येथून आपचे उमेदवार होते, मात्र दोघांनाही वाईट पराभव पत्करावा लागला. दिल्ली विधानसभेत 'आप'ला मिळालेल्या विजयानंतर हरियाणामध्ये पक्षाची लोकप्रियता वाढली होती. त्यानंतर पक्षाने हरियाणावर लक्ष केंद्रित करत तेथून मोठ्या उत्साहात निवडमूक लढली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत 'आप'चा राज्यात दणकून पराभव झाला. 
दरम्यान  'आप'ने आता येत्या ऑक्टोबरमध्ये होणा-या हरयाणा विधानसभा निवडणुकांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान आपण पक्षाचा राजीनामा दिला नसून या सर्व निव्वळ अफवा आहेत, असे यादव यांनी ट्विटरवरून स्पष्ट केले आहे. आपण अजूनही पक्षातच असून पूर्वीपेक्षाही अधिक जोमाने काम करण्यास कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.