शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

केजरीवाल घसरले; भाषणात केला मनोज तिवारींच्या वडिलांचा वादग्रस्त उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 17:12 IST

अरविंद केजरीवाल यांनी भाजप नेते मनोज तिवारी यांच्या दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासंदर्भातील आक्षेपाचा समाचार घेतला.

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाने आगामी लोकसभा निवडणूक दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या मुद्द्यावर सध्या दिल्लीतील राजकारण तापले आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप नेते मनोज तिवारी यांच्या वडिलांना संबोधून वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 

दिल्लीत एका सभेला संबोधित करताना केजरीवाल यांनी तिवारी यांच्या दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासंदर्भातील वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, गुजरात, आंध्रप्रदेश, बिहार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यासाठी आंदोलने केली आहेत. या राज्यांना देखील कमकुवत करणार का ? दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यापासून रोखणारे मनोज तिवारी आहे तरी कोण ? दिल्ली राज्य मनोज तिवारींच्या बापाचे आहे काय ? दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी मनोज तिवारी यांच्या बापाने आंदोलन केले नाही, असं वादग्रस्त वक्तव्य केजरीवाल यांनी केले. 

काही दिवसांपूर्वीच मनोज तिवारी यांनी म्हटले होते की, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात येऊ नये, असे केल्यास देशातील संघराज्य पद्धतीला धोका निर्माण होईल. 

केजरीवालांकडून भाजपच्या घोषणापत्राचे दहणदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत आयोजित जाहीर सभेत भाजपच्या 2014 मधील घोषणा पत्राची होळी केली. भाजपच्या 2014 च्या घोषणापत्रात दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील सात जागा जिंकल्यास दिल्लीला पूर्ण राज्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र भाजप आणि मोदी यांनी दिल्लीकरांना फसवले आहे. मागील 70 वर्षांपासून दिल्लीतील लोकांचा अपमान करण्यात येणार असून यापूढे हे सहन केले जाणार नाही, असंही केजरीवाल यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीAAPआप