शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
3
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
4
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
5
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
6
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत
7
“RSS चा स्वयंसेवक होतो, पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे”; हायकोर्ट जजने थेट सांगितले
8
कतरिना कैफही आहे गरोदर? ओव्हरकोट ड्रेसमध्ये दिसला बेबीबंप; नवऱ्यासोबत लंडनमध्ये फेरफटका
9
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
10
'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
11
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश
12
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
13
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
14
'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर
15
"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत
16
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
17
₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 
18
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
19
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
20
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 

केजरीवाल- अमरिंदर सिंग यांच्यात आता ट्विटर वॉर

By admin | Published: October 24, 2016 7:29 PM

सोमवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यात ट्विटरवर आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी रंगली.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 24 -  अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आपच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. राज्यात सत्ताधारी अकाली दलाविरोधात वातावरण असल्याने दोन्ही पक्षांना पंजाबची सत्ता काबीज करण्याचे वेध लागले आहेत. त्यावरून काँग्रेस आणि आपच्या नेत्यांमध्ये सध्या शाब्दिक चकमकी उडत असून, सोमवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यात ट्विटरवर आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी रंगली. 
सोमवारी सकाळी केजरीवाल यांनी अमरिंदर सिंग यांच्यावर ते विक्रम सिंग मजिठिया यांनी ड्रग्ज विक्रीतून आलेल्या पैशातून प्रचार करत असल्याचा आरोप ट्विटरवरून केला. त्यानंतर अमरिंदर सिंग यांनी तुमच्या रोजच्या नाटकांना लोक वैतागल्याचे ट्विट करत केजरीवाल यांना प्रत्युत्तर दिले.  त्यानंतर दोघांनीही एकमेकांना खुल्या वादविवादाचे आव्हानही दिले.
 (पंजाब निवडणुकीसाठी बाहेरची मतयंत्रे)
यावेळी केजरीवाल यांनी थेट सोनिया आणि राहुल गांधींसोबतही चर्चा करण्याची तयारी दर्शवली. तसेच अमरिंदर सिंग यांना भाजपावाले पाठिंबा देत असल्याचाही आरोप केला. त्यावर वैतागलेल्या अमरिंदर सिंग यांनी आता तुम्ही डोनाल्ड ट्रम्प हेही तुमच्याविरुद्धच्या कटात माझ्यासोबतच्या कटात सामील आहेत, असा टोला केजरीवालांना लगावला.