शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

न्यायसंस्था निष्कलंक ठेवण्यासाठी ‘कारस्थाना’चा सखोल शोध घेऊ; सुप्रीम कोर्टाची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 06:17 IST

दावा करणाऱ्याने दिलेले पुरावे सीलबंद

नवी दिल्ली : सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावरील असभ्य वर्तनाचे आरोप एकट्या व्यक्तीचे काम नसून न्यायालयाच्या काही नाराज, बडतर्फ कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कॉर्पोरेट व फिक्सरनी रचलेले कारस्थान आहे का, याची सखोल तपास करून खातरजमा करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी ठरविले.न्या. अरुण मिश्रा, न्या. रोहिंग्टन नरिमन व न्या. दीपक गुप्ता यांच्या विशेष खंडपीठाने सीबीआय व इन्टलिजन्स ब्युरोच्या संचालकांना व दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना बोलावून घेऊन हा तपास कसा जाऊ शकतो, याविषयी चर्चा केली. कारस्थानाचा दावा करणाºया अ‍ॅड. उत्सव सिंग बैन्स यांनी सादर केलेली कागदपत्रे व काही सीसीटीव्ही फूटेज न्यायालयाने ताब्यात घेऊन सील केले. अ‍ॅड. बैन्स आणखीही माहिती गुरुवारी देतील. ती मिळाल्यावर तपासाचा आदेश दिला जाईल. न्यायसंस्थेला बट्टा लागू न देता, तिची प्रतिमा निष्कलंक ठेवणे ही आमची जबाबदारी आहे. त्यासाठी याचा अगदी खोलात शिरून नक्की तपास केला जाईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले, तसेच अ‍ॅड. बैन्स यांना संरक्षण देण्याचे आदेश दिले.न्यायिक बाजूवर हे प्रकरण सुरू असतानाच, प्रशासकीय पातळीवर आरोपांच्या चौकशीसाठी तीन न्यायाधीशांची समिती नेमली आहे. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सुरू राहिल्याने त्यांचा एकमेकांवर विपरीत परिणाम होऊ शकेल, अशी शंकाही व्यक्त झाली. त्यावर खंडपीठाने नमूद केले की, तसे होण्याची शक्यता नाही. तसे न होण्याची काळजी घेऊ. प्रशासकीय चौकशी व न्यायिक बाजूवरील ही सुनावणी यांच्या कक्षा भिन्न आहेत.‘फिक्सर’ना स्थान नाहीखंडपीठाने म्हटले की, खंडपीठांवरील न्यायाधीशांना ‘खिशात’ घालून त्यांच्याकडून हवे तसे निकाल मिळवून देण्याचा दावा करणाºया काही ‘फिक्सर’ची नावेही अ‍ॅड. बैन्स यांनी दिली आहेत व अशा लोकांशी भेटीगाठी झाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. न्यायसंस्थेत अशा ‘फिक्सर’ना स्थान नसल्याने, याच्या मुळात शिरून शहानिशा करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय