शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

केसीआर यांचा आज शपथविधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 06:27 IST

तेलंगणात पुन्हा बाजी मारणारे टीआरएसचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांची बुधवारी अपेक्षेप्रमाणे विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड झाली.

हैदराबाद : तेलंगणात पुन्हा बाजी मारणारे टीआरएसचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांची बुधवारी अपेक्षेप्रमाणे विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड झाली. त्यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी गुरुवारी होणार आहे. आत त्यांना आश्वासने ठराविक मुदतीत पूर्ण करावी लागतील. राज्यातील ११९ जागांपैकी तब्बल ८८ जागा त्यांच्या पक्षाने जिंकल्या.केसीआर यांनी येत्या मार्चपर्यंत राज्यातील एक कोटी एकर जमीन सिंचनाखाली आणण्याचे आश्वासन प्रचारात दिले. कालेश्वरम जलसिंचन प्रकल्प मुदतीत पूर्ण करण्यात येईल असेही त्यांनी ठासून सांगितले होते. अन्न, वस्त्र, निवारा यासंबंधीच्या आश्वासनांना जनता भुलते हे राजकारण्यांना माहीत असते. जनतेसाठी दोन बीएचके आकाराच्या दीड लाख घरांचे सुरू असलेले बांधकाम, निवडणूक आचारसंहितेमुळे कंत्राटदारांना निधी न मिळाल्याने थांबले होते. त्यांनी २०२४ पर्यंत राज्यात साडेपाच लाख घरे बांधण्याचे आश्वासन दिले आहे. ही घरे वेगाने पूर्ण करून त्यांचा ताबा लोकांना लवकरात लवकर द्यावा लागेल.सुमारे अडीच कोटी लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी नळांची जोडणी, भागीरथी योजनेच्या अंतर्गत सर्वांना पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांना १ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी अशी अनेक आश्वासने केसीआरना मुख्यमंत्रीपदाच्या दुसºया कारकीर्दीत पूर्ण करावी लागतील. तीच त्यांच्यासाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे. टीआरएसला ४६.३८ टक्के मते मिळाली. गेल्या निवडणुकांत हे प्रमाण ३४.०४ टक्के होते.काँग्रेस, टीडीपी, सीपीआय, टीजीएस यांना मिळून गेल्या वेळी वेगळे लढूनही एकत्रितपणे ४०.४६ टक्के मते मिळाली होती. यंदा एकत्र लढूनही या पक्षांची मते ८ टक्क्यांनी घसरून ३२.६९ टक्क्यांवर आली. म्हणजेच तिथे जी महाआघाडी झाली होती, ती आपला प्रभाव पाडूच शकली नाही.पराभव सहन न झाल्याने दोघे थेट रुग्णालयातनिवडणुकांतील पराभवाचा धक्का सहन न होऊन प्रकृती बिघडल्याने दोन उमेदवारांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करावे लागले. नालगोंडातील काँग्रेसचे उमेदवार कोमतीरेड्डी वेंकट रेड्डी व पलैर येथील टीआरएसचे उमेदवार नागेश्वर राव हे सध्या उपचार घेत आहेत.

टॅग्स :Telanganaतेलंगणा