हैदराबाद : टीआरएसचे नेते के. चंद्रशेखर राव यांना जनतेनेच विकास होईल, या आशेवर सत्ता दिली होती. मात्र, त्यांनी विश्वासघात केला आहे. आता याला उत्तर म्हणून जनता काँग्रेस, टीडीपी, टीजेएस व सीपीएम आघाडीला पर्याय म्हणून बघत आहे, असे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.तेलंगणाच्या निर्मितीसाठी आम्ही योगदान दिले आहे, असे सोनिया गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे. त्यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ तयार करून काँग्रेसने तो सोशल मीडयावर टाकला.टीआरएसचेच सरकारजनतेचा टीआरएस आणि केसीआर यांना पाठिंबा आहे. त्यामुळे टीआरएसला सरकार स्थापन करण्यासाठी आमच्या मदतीची गरज भासणार नाही, ते बहुमताने विजयी होतील, असे एमआयएमचे नेते असुदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले.पोलीस अधिकाऱ्यास हटवलेकाँग्रेसचे नेते रेवंथ रेड्डी यांना जबरदस्तीने अटक करणाºया एसपी दर्जाच्या पोलीस अधिकाºयास हटविल्याचे निवडणूक अधिकारी रजत कुमार यांनी सांगितले आहे.
केसीआर यांनी केला जनतेचा विश्वासघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 06:43 IST